पारनेर : प्रत्येक गावात विकासगंगा आणणार : आ. लंके | पुढारी

पारनेर : प्रत्येक गावात विकासगंगा आणणार : आ. लंके

पारनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठी आपण कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून, पारनेर-नगर मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासाची गंगा पोहोचविणार असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले. राळेगणसिद्धी येथील पद्मावती, पठारे वस्ती ते मापारी वस्ती, कदम वस्ती, फटांगडे वस्ती या 46 लाख 74 हजार 196 रुपये खर्चाच्या रस्ताकामाचा प्रारंभ आमदार लंके यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. सरपंच जयसिंग मापारी अध्यक्षस्थानी होते.

आमदार लंके म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लावली. कोरोनात विकासकामांच्या निधीला कात्री लागली असतानाही अजित पवार यांनी पारनेर-नगर मतदारसंघाला निधी कमी पडू दिला नाही.
माजी सरपंच माधव मापारी, उपसरपंच मंगल उगले, दादाभाऊ पठारे, गणपतराव मापारी, अमोल मापारी, अमोल पठारे, दादाभाऊ मापारी, गणेश पठारे, राजू भालेकर, महेंद्र गायकवाड, विलास औटी यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा

अकोले : रस्त्यावर भरणारा भाजीपाला बाजार नगरपालिकेने केला स्थलांतरीत

शेवगाव : मुळा आवर्तनाबाबत राजळे-घुले यांच्यात श्रेयवाद पेटला

नवीन पनवेल, भिवंडीमधून भांगेचा मोठा साठा जप्त

Back to top button