नवीन पनवेल, भिवंडीमधून भांगेचा मोठा साठा जप्त | पुढारी

नवीन पनवेल, भिवंडीमधून भांगेचा मोठा साठा जप्त

पनवेल : पुढारी वृत्तसेवा : विविध पदार्थांत भांग मिस्क करून त्याची विक्री करणाऱ्या व्यवसायिकांवर कारवाई करत, राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुबई भरारी पथकाने नवीन पनवेल सेक्टर १३ मधून २८ लाख तर भिवंडी येथून १ कोटी ४५ लाखांची भांग जप्त केली आहे. तसेच या भांगेची वाहतूक करणारे चार वाहने देखील ताब्यात घेतली आहेत. जवळपास १ कोटी ७३ लाख ९५ हजारांची भांग जप्त केली आहे.

नवीन पनवेल सेक्टर १३ येथील नीलम जनरल स्टोरमधून भांग मिश्रित पदार्थ विकत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट राज्य मुंबई पथकाला मिळाली होती. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्काच्या पथकांनी घटनास्थळी छापा मारला. जनरल स्टोरमध्ये साठवून ठेवलेले भांग मिश्रित पदार्थ पथकाच्या हाती लागले. या भांगेचे वजन  जवळपास २ हजार ३४० किलोग्रॅम आहे. तसेच याचे बाजारमूल्य देखील २८ लाख ८ हजार रुपये किंमत असल्याचे सांगितले जात आहे. या वेळी दुकानात बसलेल्या विशाल मन्नालाल चौरसिया वय ६१ वर्ष याला ताब्यात घेऊन चौरसिया यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमा नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

ताब्यात घेतल्यानंतर या आरोपीची अधिक चौकशी केल्यानंतर राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाला धक्कादायक माहिती मिळाली. भिवंडी येथील एका कंपनीतून हा माल येत असल्याची माहिती विशाल चौरसिया यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, या पथकांनी भिवंडी येथील पत्त्यावर जाऊन छापा टाकला. यावेळी ७ हजार १३९ ग्रॅमचे भांग मिश्रित पदार्थ आढळून आले. भिवंडी येथील व्यापारी सेफ ट्रान्सपोर्ट कंपनी भिवंडी गाळा नंबर १९ श्रीराम कॉम्प्लेक्स, दापोडा रोड, मानकोली यांच्या कंपनीतून येथून हा  अधिकची भांग मिश्रित साठा जप्त केला आहे.
याप्रकरणी कंपनीचे मॅनेजर धर्मेंद्र शुक्ला याला अटक करून अधिक चौकशी केल्यानंतर याच कंपनीमधून हा माल, नवीन पनवेल येथे पोर्टरद्वारे पाठवल्याची माहिती त्यांनी दिली. या जप्त केलेल्या भांगेचे बाजारमूल्य हे १ कोटी ४५ लाख ७७ हजार ३७६ रुपये होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्काने दिली. यासोबत या मालाची वाहतूक करणारे ४ वाहने देखील पथकाने जप्त केली आहेत. या दोन्ही आरोपी विरोधात महाराष्ट दारू बंदी अधीनियमानुसार करावाई करुन गुन्हा दाखल केला आहे. एकूण १ कोटी ७३ लाख ९५ हजार ३७६ रुपयांची भांग मिश्रित पदार्थ जप्त केले आहेत. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नवीन सेक्टर १३ मधील नीलम जनरल स्टोरमधून २८ लाखाची  भांग मिश्रित पदार्थ राज्य उत्पन्न शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबईच्या टीमने जप्त केली आहे. त्या सोबत भिवंडी येथून देखील १ कोटी ४५ लाख ७७ हजार ३७६ रुपयांची भांग मिश्रित पदार्थ जप्त केले आहेत.

ब्रॅण्डेट कंपनीचे प्लास्टिक पाऊच करून ही भांग दुकानातून विकली जात होती. भिवंडी येथील कंपनीतून हा माल थेट नवीन पनवेलला यायचा आणि नवीन पनवेलमधील ग्राहकांपर्यंत पोहोचवला जायचा.

Back to top button