अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : पावणेतीन महिन्यांत जिल्ह्यात सरासरी 276.5 मि.मी. पाऊस अपेक्षित होता. मात्र, 185.5 मि.मी. पाऊस झाला. अपेक्षित पावसाच्या तुलनेत 20 टक्के पाऊस कमी झाला आहे. या पावसात देखील पेरणी शंभर टक्के झाली. परंतु पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पेरणी वाया जाण्याची भीती बळावली आहे. दमदार पावसाअभावी भूजलपातळी खालावून जिल्ह्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी 448.1 मि.मी. पाऊस अपेक्षित आहे. जून ते 23 ऑगस्ट या कालावधीत सरासरी 276.5 मि.मी. पाऊस अपेक्षित आहे. परंतु जून महिन्यातील दोन नक्षत्र कोरडेठाक गेले. जुलै महिन्यातील सूर्याचा पुष्य नक्षत्राने जाता जाता दोन दमदार पाऊस दिले. त्यामुळे सरासरी वाढण्यात मदत झाली. त्यामुळे खरीप पेरणीला वेग आला.
आश्लेषा नक्षत्रात काही ठिकाणी रिमझिम झाली. जिल्ह्यात खरीप पेरणी शंभर टक्के झाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली. गेल्या वर्षी 339.5 मि.मी. पाऊस झाला होता. वार्षिक पावसाच्या तुलनेत 76 टक्के पाऊस झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 154 मि.मी. पाऊस कमी झाला आहे.
नगर 42.9, पारनेर 42, श्रीगोंदा 45.6, कर्जत 43.9, जामखेड 52.9, शेवगाव 48, पाथर्डी 53.1, नेवासा 43.6, राहुरी 23.5, संगमनेर 30, अकोले 55.1, कोपरगाव 32.6, श्रीरामपूर 24.8, राहाता 35.3.
हेही वाचा