नगर : जलजीवन मिशन योजनेच्या पाईपची चोरी | पुढारी

नगर : जलजीवन मिशन योजनेच्या पाईपची चोरी

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा :  जलजीवन मिशन योजना तालुक्यात राबविली जात असून या योजनेचे पाईप चोरीचे सत्र सुरुच आहे. पठार भागातील अकलापूर येथील सावळेवस्ती वरील जलजीवन योजनेचे 3 लाख 43 हजार रुपयांचे 52 पाईप अज्ञात चोरट्याने चोरुन नेले असून या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पठार भागातील अकलापूर गावातील सावळे वस्तीवर जलजीवन मिशनचे पाईप ठेवण्यात आले होते.

या ठिकाणी नावेद (पुर्ण नाव माहीत नाही) हा काम करीत होता. त्याने चार चाकी वाहनातून येवून कंपनीच्या परवागी शिवाय स्वत:चे फायद्याकरीता लबाडीच्या इराद्याने जलजीवन मिशनचे पाईप दि. 9 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता चार चाकी गाडीत टाकुन चोरुन नेले.
कंपनीचे वरिष्ठांशी चर्चा करुन फिर्याद देण्यास आली असून दि. 18 ऑगस्ट रोजी रामदास पोपट लबडे (वय 40, धंदा-साईट इंजिनियर रा. संगमनेर कॉलेज जवळ) याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पो. नि. खेडकर यांचे मार्गदर्शना खाली पुढील तपास पोलिस करीत आहे.

हेही वाचा :

शेवगाव-पाथर्डीत नवीन योजनेद्वारे पाणी : आमदार मोनिका राजळे

नगर : जवळ्यात कांदा प्रश्नावर रस्तारोको

Back to top button