संगमनेर : मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद | पुढारी

संगमनेर : मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद

संगमनेर शहर/बोटा : पुढारी वृत्तसेवा : भाविकांचे श्रध्दास्थान पुणे जिल्हातील नळावणे खंडोबा मंदिर व अकलापूर( संगमनेर) दत्त मंदिरात चोरी करणारे तसेच घरफोडी व इतर चोरी करणारे अट्टल गुन्हेगाराची टोळी पकडण्यात आळेफाटा पोलीसांना यश आले आहे. यात पिकअप व मोटार सायकल असा एकुण 10,00,00 रू) किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आळेफाटा , जुन्नर तसेच घारगाव (संगमनेर) पोलीस स्टेशन कडील एकुण 9 गुन्हे उघडकीस आले .

आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत खंडोबा मंदिर तसेच रामेश्वर मंदिर व जेजुरी लिंग मंदिरामध्ये अज्ञात चोरटयांनी दरवाजा तोडून चोरीचा प्रयत्न केला. रामेश्वर मंदिरातील दानपेटी चोरून रोख रक्कम तसेच जेजुरी लिंग मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून दानपेटी तसेच घंटा चोरल्याचा गुन्हा दाखल होता.

गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी पथके तयार करून सुचना केल्या होत्या. पथक अधिकारी सपोनि सुनिल बडगुजर व पथकाने गुन्हयाची तांत्रिक माहितीनुसार अज्ञात आरोपींचा माग काढत सचिन गंगाधर जाधव ( रा. औरंगाबाद ) याला ताब्यात घेवून सखोल चौकशी केली. त्याचे साथीदार किरण सुनिल दुधवडे (साकुर रा. अकलापुर ता. संगमनेर ) सुरेश पंढरीनाथ पथवे (रा. आवारी धामणगाव ता. अकोले ) सुनिल उमा पथवे (रा. आवारी धामणगाव ता. अकोले ) नवनाथ विजय पवार ( रा. साकुर मांडवे ता.

संगमनेर ) यांच्या मदतीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने पथक रवाना करून 5 जणांना अटक केली. आरोपींकडून मंदिर चोरीतील मंदिरातील साहित्य घंटा, एम्पली फायर मशिन, समई, आरतीचे ताटे, पितळी ताटे तसेच अंगणवाडी चोरीतील टी. व्ही., स्पीकर युनिट, गॅस शिवडी, गॅस टाकी तसेच 2 मोटार सायकल तसेच गुन्हयात वापरलेली बोलेरो पिकअप गाडी व मोटार सायकल असा एकुण 10,00,000/- रू किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

पो नि श्. वाय. के. नलावडे , स. पो. नी. सुनिल बडगुजर, पो. स. ई. ए. जी. पवार, पो. स. ई कांबळे, सहा फौजदार चंद्रशेखर डुंबरे, सहा फौजदार टाव्हरे, पो. हवा. विनोद गायकवाड, पो. ना. पारखे, पो. ना. पोळ, पो. कॉ. अमित माळुजे, पो. कॉ नविन अरगडे, पो. कॉ. हनुमंत ढोबळे, पो. कॉ लोहोटे, पो.कॉ प्रशांत तांगडकर आदिंनी या कामी मदत केली.

हेही वाचा

शिवसैनिक आक्रमक : संगमनेरात माजी खासदार यांचा पुतळा टांगला उलटा

पिंपरी : महापालिका हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक; खा. श्रीरंग बारणे यांची माहिती

कात्रज बाह्यवळण मार्गावर खुलेआम वेश्या व्यवसाय!

Back to top button