अहमदनगर : डाळिंबाची चोरी करणार्‍यांना बेड्या; चोरीचा माल विकला | पुढारी

अहमदनगर : डाळिंबाची चोरी करणार्‍यांना बेड्या; चोरीचा माल विकला

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : वडाळा बहिराबा(ता. नेवासा) येथील शेतकर्‍याला मारहाण करून डाळिंब चोरणार्‍यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारेगाव (ता. नेवासा) येथून जेरबंद केले. गुन्ह्याच्या तपासाकामी त्यांना शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. साईनाथ बाबुराव आहिरे (रा. कोरगाव, ता. नेवासा), नवनाथ सोमनाथ गवळी (रा. आंतरवली, ता. नेवासा), अक्षय दिलीप आहेर (वय 22), लालू बाबुराव आहिरे (वय 30), वाल्मिक बबन आहिरे (वय 22, तिघे रा. चितळी, ता. पाथर्डी), नानासाहेब चांगदेव बर्डे (वय 30), प्रल्हाद शंकर पवार (वय 40), विठ्ठल सोपान बर्डे (वय 30, तिघे रा. कोरगाव, ता. नेवासा), आकाश पोपट माळी (पसार), एक विधीसंघर्षीत बालकाचा आरोपीमध्ये समावेश आहे.

वडाळा बहिरोबा (ता. नेवासा) येथील बाबासाहेब सुधाकर मोटे व त्यांचे शेजारील शेतकर्‍याचे शेतातील 3 लाख 40 हजार रुपयांचे परिपक्व 150 कॅरेट डाळिंब अनोळखी आरोपींनी शेतकर्‍यास मारहाण करून चोरुन नेले. याबाबत शनिशिंगणापूर पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना 7 ते 8 आरोपींनी मारहाण करुन डाळिंबाची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दरोड्याचे गुन्हा नोंदविला. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिस निरीक्षक दिनेश अहिरे यांना माहिती मिळाली.

हा गुन्हा साईनाथ आहिरे व नवनाथ गवळी यांच्या साथीदारांनी केला असून ते कोरगाव शिवारात आहेत. त्यानुसार पोलिसांनी कोरगाव शिवारातून वरील आरोपींना ताब्यात घेतले. डाळिंब टेम्पोमध्ये भरून बाजार विक्री केले. त्यानंतर सर्वांनी पैसे वाटून घेतल्याची कबुली त्यांनी दिली. बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय गव्हाणे, अतुल लोटके, रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, किशोर शिरसाठ, बाळासाहेब खेडकर, मेघराज कोल्हे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा

यापुढे डॉक्टरांच्या प्रायोजित ‘पंचतारांकित पार्ट्या’ बंद!

अहमदनगर : मंदिरात चोरी करणारी टोळी एलसीबीकडून गजाआड

मासे खाल्ल्यामुळे बाईमाणूस चिकनी दिसते : विजयकुमार गावित

Back to top button