रूईछत्तीशी : पावसाअभावी खरीप पिके करपली | पुढारी

रूईछत्तीशी : पावसाअभावी खरीप पिके करपली

रूईछत्तीशी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील रूईछत्तीशी परिसरातील खरीप पिके पावसाअभावी करपून चालली आहेत. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मका, कापूस, सोयाबीन, ऊस, बाजरी या पिकांना पाण्याची गरज असूनस शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. काही पिकांची खुरपणी पूर्ण होऊन पिकांनी कात टाकली आहे, पण आता पाऊस नसल्याने पिके करपू लागली आहेत. शेतकर्‍यांचा दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे.

जनावरांच्या चार्‍यासाठी शेतात लावलेला ऊसदेखील करपू लागला आहे. त्यामुळे जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. विकत चारा घालण्याची वेळ आल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. पिकांवर पडलेला रोग, मजुरांची कमतरता, यामुळे फवारलेले तणनाशक, यामुळे शेतकर्‍यांना खूप आर्थिक खर्च आला आहे. त्यातून सावरण्यासाठी पावसाने साथ देणे गरजेचे आहे.

शेतकर्‍यांचा दूध व्यवसाय संकटात सापडला आहे. कांदा, कापूस, मका, सोयाबीन, बाजरी या पिकांसाठी केलेला खर्च वाया जाण्याची भीती आहे. सरकारने तत्काळ पिकांचे पंचनामे करुन अनुदान जाहिर करावे व जनावरांसाठी चारा डेपोची सोय करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. गावोगावी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई देखील निर्माण झाली आहे.

हेही वाचा

बलात्कार पीडितेला गर्भपात करण्यास सुप्रीम कोर्टाकडून परवानगी

आयुष्याच्या रंगमंचावर जीवनाचाच ‘तमाशा’; कलावंतांना जिवंतपणीच मरण यातना

सिंधुदुर्ग : पावशीत कार-मोटरसायकलचा अपघात, एक गंभीर

Back to top button