राहुरी पोलिसांकडून टारगटांना मिळाला ‘प्रसाद’ | पुढारी

राहुरी पोलिसांकडून टारगटांना मिळाला ‘प्रसाद’

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राहुरी महाविद्यालयीन परिसरामध्ये टारगटांचा वाढलेला उपद्रव पाहता आमदार प्राजक्त तनपुरे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य व पोलिस प्रशासनाची बैठक घेत टारगटांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना केल्या होत्या. पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तत्काळ अ‍ॅक्शन मोड घेत टारगटांना पोलिस ठाण्यात आणत चांगलाच धडा शिकवला. राहुरी हद्दीतील महाविद्यालय व शालेय परिसरामध्ये कोणतेही कारण नसताना काही टारगट टोळक्याने एकत्र येतात.

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थींनींची छेडछाड करणे, टोळी करून हाणामार्‍या करणे आदी प्रकार सर्रासपणे घडतात. याबाबत आमदार तनपुरे यांनी लक्ष वेधत राहुरी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व पोलिस प्रशासनाची एकत्र बैठक घेतली. याप्रसंगी तनपुरे कारखान्याचे संचालक विजय डौले हे उपस्थितीत होते.

बैठकीनंतर पोलिस निरीक्षक जाधव यांनी तत्काळ अ‍ॅक्शन मोड घेत शाळा व महाविद्यालयामध्ये साध्या गणवेशामध्ये पोलिस कर्मचारी तैनात केले. शाळा व महाविद्यालयांमध्ये अनाधिकृतपणे टोळकी करून वावरणार्‍यांना पकडून पोलिसांनी पोलिस ठाण्यात आणले.
पोलिस निरीक्षक जाधव यांनी संबंधित टोळक्यांना चांगलाच धडा शिकवला. शालेय व महाविद्यालयिन आवारात मुलींना त्रास देणार्‍यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस प्रशासन वॉच ठेऊन आहेत. विनाकारण शालेय व महाविद्यालयिन आवारात कोणीही फिरकू नये. अन्यथा कायदा काय असतो हे दाखवून दिले जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.

याबाबत पोलिस निरीक्षक जाधव यांनी सांगितले की, माझा मोबाईल क्रमांक पोलिस ठाण्यात उघडपणे लावण्यात आलेले आहेत. कोणतीही तक्रार असल्यास माझ्याशी थेट संपर्क साधा. राहुरीत कोणताही अनूचित प्रकार सहन करणार नाही. पोलिस प्रशासन आपली भूमिका चोख पार पाडत असल्याचे पोलिस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.

गुन्हेगारीला आळा घालणार : पो. नि. जाधव

राहुरी हद्दीमध्ये अनेक प्रकारचे गुन्हे घडत आहे. नागरीकांच्या समस्या लक्षात घेता पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होत आहेत. गुन्हेगारांना धडा शिकविण्यासाठी पोलिस प्रशासन कार्य करीत आहेत. राहुरी हद्दीतील गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे पोलिस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा

हरित नगरची निर्मिती करणार : आ. संग्राम जगताप

अहमदनगर : बिबट्याचा सहा महिन्यांपासून मुक्तसंचार

कोळ्याच्या शरीरातून उगवली मोडासारखी बुरशी

Back to top button