विधानसभेच्या 51, तर लोकसभेच्या 11 जागा हव्या : जोगेंद्र कवाडे | पुढारी

विधानसभेच्या 51, तर लोकसभेच्या 11 जागा हव्या : जोगेंद्र कवाडे

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : पीपल्स रिपब्लिकन पक्ष व शिवसेना (शिंदे गट) यांची आघाडी आहे. त्यामुळे आगामी काळात होणार्‍या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत विधानसभा 51 व लोकसभा 11 जागांवर आम्ही दावा केला आहे. त्यावर वाटाघाटीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा होणार आहे, अशी माहिती पीपल्स रिपब्लिक पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पीपल्स रिपब्लिक पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, सोमनाथ शिंदे, नितीन कजबेकर, मधुकर पावसे, संजय उनवणे, महेंद्र साळवे आदी उपस्थित होते. प्रा. कवाडे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाची घोडदौड सुरू आहे. त्यांनी मातोश्रीवर बसून कारभार चालविला. मात्र, शिंदे यांनी लोकाभिमुख कारभार पाहत आहेत. शिंदे यांनी शेतकरी, शेत मजूर, दलित, अल्पसंख्याक यांच्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत.

सुरूवातील स्वाभिमानी शेतकरी संघटना, समावादी पक्ष व आम्ही आग्रह धरला म्हणून शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी असे सरकार स्थापन झाले. मात्र, निर्णय घेण्यासाठी त्यांनी समन्वय समिती स्थापन करावी, अशी मागणी केली होती. पण अडीच वर्षांत समिती स्थापन केली नाही. शिंदे गट-भाजप असे सरकार स्थापन झाले. आता त्यात पुन्हा अजित पवार गट सामील झाला आहे. त्यामुळे सर्व मित्र पक्षांशी चर्चा होऊन जागा वाटप होणार आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी महाज्योती, सारथी, बार्टी सारख्या संस्था सुरू केल्या आहेत. मात्र, त्यात बार्टीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. गायराण जमिनीवरील अतिक्रमणधारकांना मालकी पट्टे द्यावेत, असे ते म्हणाले.

हेही वाचा

नाशिक : मेट्रो निओ अनिश्चिततेच्या गर्तेत! डिसेंबरअखेर प्रकल्पाची मुदत संपणार

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या ऑनलाईन बुकींगमध्ये १२ कोटींची अफरातफर; २ आरोपी विरोधात गुन्हा दाखल

रस्त्यांची दुरुस्ती होणार कधी? केशवनगर येथे नागरिकांचा सवाल

Back to top button