संगमनेर : अतिक्रमणित रस्ते पाणंद अभियानातून मोकळे होणार : राधाकृष्ण विखे | पुढारी

संगमनेर : अतिक्रमणित रस्ते पाणंद अभियानातून मोकळे होणार : राधाकृष्ण विखे

संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राज्यातील अनेक अतिक्रमणित रस्ते आणि बांधावरून मोठ्या प्रमाणात वाद होत होत. परंतु आता इथून पुढे हे सर्व बांधावरचे वाद कायमचे बंद करण्यासाठी राज्यभरात सर्व अतिक्रमण्यत रस्ते पानंद रस्ता अभियानातून मोकळे करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला असल्याचे महसूलमंत्री व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले
अधिक मासानिमित जाखुरी येथे सुरू असलेल्या गगनगिरी महाराज अखंड हरीनाम सप्ताहास मंत्री विखे पाटील यांनी भेट देवून भाविकांशी संवाद साधला. याप्रसंगी मंत्री विखे बोलत होते.

मंत्री विखे म्हणाले, राज्यात जनतेच्या मनातील सरकार आल्यानंतर महसूल विभागाच्या माध्यमातून पानंद आणि शेत शिवार रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यचा निर्णय घेण्यात आला. बहुतांशी रस्ताचा प्रश्न मार्गी लागत असल्याने ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या मंत्राने देशात आणि राज्यात सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय होत आहेत.

राज्यात शासन आपल्या दारी या उपक्रमातून सरकार थेट जनतेपर्यत पोहचत आहे. या सर्व कामासाठी सरकारला अध्यात्मिक पाठबळ सुध्दा मिळत आहे. राज्याला मिळालेला वारकरी सांप्रदायाचा वारसा सप्ताहाच्या माध्यमातून गावोगावी जपण्याचे काम खूप महत्वाचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

सप्ताह समितीच्या वतीने मंत्री विखे पाटील यांचा सत्कार संजय महाराज देशमुख यांनी केला. या कार्यक्रमास सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे, महाराजांचे वंशज चंद्रकात पाटणक, शिवाजीराजे पाटणकर, संजय पाटणकर, संजय माने, वसंतराव देशमुख , आबासाहेब थोरात, डॉ. सोमनाथ कानवडे, अमोल खताळ, कपिल पवार यांच्यासह भक्तपरीवार उपस्थित होते.

मंदिराचा क वर्गात समावेश करणार : ना विखे

जाखुरी गावचे श्रध्दास्थान जाखुआई मंदीराचा तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधीची उपलब्धता करून मंदिराचा क वर्गात समावेश करणार असल्याची ग्वाही महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

हेही वाचा

नाशिक जिल्ह्यात शंभर एकरमध्ये आयटी हब उभारणार : उद्योगमंत्री उदय सामंत

पिंपरी : डोमिसाईल, उत्पन्न दाखल्यांसाठी नागरिकांची धावपळ

पाच हजार वर्षांपूर्वीचा ‘ओत्झी’ होता टक्कलग्रस्त?

Back to top button