

उंबरे : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यात लव्ह जिहादचे प्रकरणे थांबण्याऐवजी वाढच होत आहे. उंबरे, वांबोरी यानंतर याचे लोन राहुरी शहरापर्यंत पोहचले आहे. राहुरी रेल्वे स्टेशन रस्त्यावरही एका मुलील आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करणार्या एका तरूणाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस पोलिसांनी अटक केलेली आहेे.
अतिक मुक्तार सय्यद (रा. राहुरी स्टेशन, ह. मु. श्रीरामपूर) असे या आरोपीचे नाव आहे. पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, सुमारे दिड वर्षापुर्वी माझ्या मुलीच्या मोबाईलमध्ये एका अनोळखी तरूणासोबत तीचे फोटो अढळून आले. याबाबत मी तिच्याकडे विचारणा केली असता तो माझा मित्र अतिक सय्यद (मुळ रा. राहुरी स्टेशन, हल्ली मुक्काम श्रीरामपूर) असून त्याची व माझी मैत्री आहे. त्यानंतर मी व आमच्या घरातील लोकांनी माझ्या मुलीला समजून सांगीतल्यानंतर तीने त्याच्याशी संबंध तोडले होते. काही महिन्यांपूर्वी अतिकने माझ्या मुलीला अनोळखी नंबर वरून फोन केला असता तो फोन माझ्या सासर्यांनी उचलल्याने त्यांचा आवाज ऐकून त्याने फोन कट केला. तसेच अतिक सय्यद याने त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवरून माझ्या मुलीचे त्यासोबत असलेले फोटा प्रसारीत केले. उंबरे गावात घडलेला प्रकारामुळे संपूर्ण देशात त्याचे पडसाद उमटले. अनेक मोर्चे व आंदोलन झाले. परंतु हे लव्ह जिहाद व धर्मांतराचे प्रकरण थांबलेले नाहीत. यामागे खूप मोठे रॅकेट असून जोपर्यंत हे रॅकेट उध्वस्त होत नाही तोपर्यंत हे प्रकार घडतच राहणार आहे. या मागचे धागेद्वारे काढण्यास पोलिस प्रशासक पूर्णपणे निकामी झाली असून या घटनेचा तपास सीबीआय किंवा इतर संस्थेला देण्यात यावा. अशीच मागणी राहुरी तालुक्यातून होत आहे.
राहुरी बनतेय लव्ह जिहादचे माहेरघर
उंबरे, देवळाली प्रवरा, वांबोरी, पानेगाव, केंद्ळ, बारागाव नांदूर, शिलेगाव, कोंढवड यासह राहुरी तालुक्यातील इतरही गावांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहे. यातील अनेक कुटुंब प्रतिष्ठीत असल्याने या घटना उघडकीस आलेल्या नाहीत. परंतु आता पालक वर्गामध्ये जनजागृती झाल्याने या घटना उघडकीस येत आहे. राहुरी तालुक्यात पोलिसांनी शाळा-शाळांमधून जनजागृती करण्यास सुरूवात केलेली आहे. महाविद्यालय, शाळेच्या बाहेर दामिनी पथकाची नेमणूकही केलेली आहे.
हेही वाचा :