नगर : शिराळवर आता 14 सीसीटीव्हीचा वॉच | पुढारी

नगर : शिराळवर आता 14 सीसीटीव्हीचा वॉच

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी शहरातील पोळा मारुती मंदिर ते दुलेचांदगाव व जुना खेर्डा रस्ता या दोन कोटी साठ लाख रुपयांच्या किमतीच्या दोन रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन आमदार राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, मृत्युंजय गर्जे, भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, नंदकुमार शेळके, चांदगावचे सरपंच रणजित बांगर, अजय भंडारी, अमोल गर्जे, विष्णुपंत अकोलकर, काकासाहेब शिंदे, रमेश गोरे, महेश बोरुडे, नामदेव लबडे, बबन बुचकुल, बंडू बोरुडे, रमेश काटे, सुरेखा गोरे, सिंधू साठे, नितीन गर्जे, बंडू पठाडे, जगदीश काळे, आशोक मंत्री, संजय बोरुडे, सुभाष बोरुडे आदी उपस्थित होते.

राजळे म्हणाल्या, भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर एका वर्षात शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात चांगला निधी मिळाला आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाने दिलेला जबाबदारीचे भान ठेवून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी योगदान द्यावे. अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांच्या गाव चलो, घर चलो अभियानावर राजळे यांनी नाव न घेता टीका केली. प्रास्तविक डॉ. मृत्युंजय गर्जे यांनी केले. सूत्रसंचालन सचिन वायकर यांनी केले. आभार रमेश गोरे यांनी मानले.

मी तुमचाच आहे : अभय आव्हाड
‘विकासकामांसाठी अजून दहा कोटींचा निधी येणार आहे. त्याबाबत मला माहिती नाही. अभय काका, खासदार विखे यांच्याकडून दहा कोटी येणार आहेत का?’ असे आमदार राजळे यांनी विचारले होते. त्यावर आव्हाड म्हणाले, ‘ताई मी तुमचाच आहे.’ त्यावर हश्या पिकला.

हेही वाचा :

हिमाचल प्रदेश : सोलनमध्ये ढग फुटी; पाच जणांचा मृत्यू, दोन घरे एक गोठा गेला वाहून

तापाचे उपचार घेणाऱ्या मुलाला दिले चक्क रेबिजचे इंजेक्शन

Back to top button