‘कुकडी’चे पाणी नांदणीत सोडा ; शेतकर्‍यांची आमदार राम शिंदे यांच्याकडे मागणी | पुढारी

‘कुकडी’चे पाणी नांदणीत सोडा ; शेतकर्‍यांची आमदार राम शिंदे यांच्याकडे मागणी

राशीन : पुढारी वृत्तसेवा :  कर्जत तालुक्यामध्ये कुकडीचे ओव्हर फ्लोचे आवर्तन सुटलेले आहे. या आवर्तनाचे पाणी नांदणी नदीमध्ये सोडून सर्व बंधारे भरण्यात यावेत, अशी मागणी शहाजी राजेभोसले यांच्यासह शेतकर्‍यांनी आमदार राम शिंदे यांना निवेदन देवून केली आहे. नांदणी नदीच्या उपबंधार्‍यांमध्ये पाण्याची साठवणूक होऊन त्याचा वापर शेतकरी शेतीसाठी, पिण्यासाठी वापर करतात. परंतु, सध्या पाऊस खूप कमी झाल्यामुळे पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. माणसांना व जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने खूप हाल सुरु आहेत.

कुकडीचे सध्याचे ओव्हर फ्लो आवर्तनाचे पाणी हे नांदणी नदीमध्ये सोडल्यास त्या खालील संपूर्ण बंधारे कुकडीचे पाणी भरता येतील. त्यामुळे शेतकरी सुखावेल आणि दुष्काळजन्य परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत होईल. या संदर्भात आदेश होऊन नांदणी नदीमध्ये पाणी सोडून सर्व बंधारे भरण्यात यावेत, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. नांदणी नदीसह चिलवडी चारीवरील काळेवाडी, कानगुडवाडी, देशमुखवाडी, परीटवाडी, करपडी आदी गावांना पाणी मिळावे, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शहाजी राजेभोसले, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष पांडुरंग भंडारे, जगन्नाथ सूळ, दत्तात्रय गोसावी, भाजपाचे राशीन शहराध्यक्ष एकनाथ धोंडे, सुनील काळे, सोमनाथ कोल्हटकर, योगेश शर्मा, संतोष सरोदे, बंडाभाऊ मोढळे, नितीन सरोदे, विलास राऊत, सचिन रेणुकर, संजय ढोगे, दिलीपराव नष्टे, सुरत परदेशी, कल्याण नवले, विशाल रेणूकर, भुजंगराव कदम, संकेत पाटील, अनिल घोडके, विलास काळे आदींच्या सह्या आहेत.

हेही वाचा :

पाय मोडला अन् ती झाली करोडपती!

नगर : ‘पाटबंधारे’चा लिपिक लाचेच्या जाळ्यात

Back to top button