नगर : ‘पाटबंधारे’चा लिपिक लाचेच्या जाळ्यात

नगर : ‘पाटबंधारे’चा लिपिक लाचेच्या जाळ्यात

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जलाशयातून शेतात पाणीउपसा करण्याच्या परवानगीसाठी पंधराशे रुपयांची लाच स्वीकारताना कुकडी पाटबंधारे विभागातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. सुभाष यादवराव वाबळे (वय 56, दप्तर कारकून असे त्याचे नाव आहे. बोरी (ता.श्रीगोंदा) येथील शेतात धनगरवाडी जलाशयातून पाणीउपसा करण्यासाठी संबंधित शेतकर्‍याने अर्ज दिला होता. परवानगी मंजूर करण्यासाठी वाबळे याने लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली.

त्यानंतर नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून वाबळेला पंधराशे रुपयांची लाच स्वीकारताना पकडले.
श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे, निरीक्षक राजू आल्हाट, रमेश चौधरी, विजय गंगुल, राधा खेमनर, रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, वैभव पांढरे, दशरथ लाड यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news