नगर : प्रवासी महिलेचा दीड लाखाचा ऐवज लंपास

नगर : प्रवासी महिलेचा दीड लाखाचा ऐवज लंपास
Published on
Updated on

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  चहा पिण्यासाठी देवगड फाट्यावर थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील दीड लाखाचे दागिने दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी धूमस्टाईलने पळविले. या महिलेने चोरट्यांना प्रतिकार करत एक तोळ्याचे सोन्याचे गंठण हातात धरून आरडाओरड केली. त्यामुळे चोरटे पसार झाले. ही घटना शुक्रवारी (दि.11) सायंकाळी सहा वाजता घडली. नगर येथील रवींद्र देशपांडे व त्यांचे नातेवाईक ट्रॅव्हलने जालना येथील दत्ताश्रम नाव्हा येथे देवदर्शन करून आल्यानंतर देवगड फाटा येथील एका हॉटेलवर ट्रॅव्हल्स थांबली होती.

यावेळी प्रतिभा अंबादास गोसावी, जयश्री अरुण तळवडकर, रत्नमाला रवींद्र देशपांडे व रश्मी गोसावी या चार महिला हॉटेलमधील शौचालयाकडे लघुशंकेसाठी गेल्या होत्या. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी प्रतिभा गोसावी यांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण ओरबाडले. आणखी एका तोळ्याचे सोन्याचे गंठण ओरबाडत असताना गोसावी यांनी प्रतिकार करून आरडाओरड केली. त्यानंतर चोरट्यांनी धूम ठोकली. याबाबत अंबादास दिगंबर गोसावी (रा.केडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नेवासा पोलिस ठाण्यात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news