SC on Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; उच्च न्यायालयाचा आदेश कायम | पुढारी

SC on Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; उच्च न्यायालयाचा आदेश कायम

नवी दिल्ली, ८ ऑगस्ट, पुढारी वृत्तसेवा, SC on Indurikar Maharaj : प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायाधीशांचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवला होता. त्यामुळे खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देत इंदुरीकर महाराज यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.पंरतु, खंडपीठाचस निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने इंदुरीकर यांना दणका दिला आहे.अशात इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

इंदुरीकर महाराज (SC on Indurikar Maharaj) यांनी शिर्डी येथील ओझरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कीर्तनात सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते असे वक्तव्य केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच पीसीपीएनडीटी सल्लागार समितीने इंदुरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान याच काळात इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून प्रथम वर्ग न्यायालयात याचिका करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. पंरतु, सत्र न्यायालयाने हा आदेश रद्द केला होता.

या निर्णयाच्या विरोधात ॲड. रंजना गवांदे यांनी ॲड. जितेंद्र पाटील व ॲड. नेहा कांबळे यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते.त्यावर सुनावणी करताना खंडपीठाने प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सत्र न्यायालयाचा निकाल रद्द केला होता.पंरतु, औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाला देखील इंदुरीकर यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.आता सर्वोच्च न्यायालयाने देखील औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत इंदुरीकर यांची याचिका निकाली काढली आहे. (SC on Indurikar Maharaj)

हे ही वाचा :

Back to top button