अहमदनगर : क्षुल्लक कारणातून बालपणीच्या मित्रावर चाकूहल्ला | पुढारी

अहमदनगर : क्षुल्लक कारणातून बालपणीच्या मित्रावर चाकूहल्ला

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : क्षुल्लक कारणावरून बालपणीच्या मित्रावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना शहरातील नेवासकर पेट्रोलपंपाजवळ रविवारी (दि.6) सायंकाळी घडली. कोतवाली पोलिसांनी आरोपीला 24 तासांच्या आत नगर तालुक्यातील निंबोडी येथून अटक केली. दरम्यान, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

राम अंकुश इंगळे (वय 28 वर्षे, रा. निंबोडी, ता. जि.नगर) असे आरोपीचे नाव आहे. सागर दत्तात्रय जाधव (वय 29, रा. निंबोडी, ता.नगर) यांच्या जबाबावरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सागर यांना आरोपी राम इंगळे याने काम असल्याचे सांगून नगरमध्ये बोलावून घेतले होते. त्यानंतर क्षुल्लक कारणावरून वाद घालून सागर यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सागर यांना गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे, उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, सलीम शेख, योगेश खामकर, रियाज इनामदार, अभय कदम, संदीप थोरात, अमोल गाढे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे, अतुल काजळे, सागर मिसाळ, नितीन शिंदे यांनी आरोपीला अटक केली.

हेही वाचा

use of brain : आपण मेंदूचा केवळ दहा टक्केच भाग वापरतो?

नाशिक : थेट रस्त्यावरील चिखलात भात लागवड, अहिवंतवाडी ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ९४ % शेतकऱ्यांचा सहभाग

Back to top button