

पारनेर, पुढारी वृत्तसेवा
पारनेर नगरपंचायतीसाठी मतदान सकाळी 7:30 वाजल्यापासून सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदानासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दुपारी १:३० वाजेपर्यंत ६१.१७ टक्के मतदान झाले आहे १७ पैकी १३ प्रभागांसाठी आज मतदान सुरू आहे. यामध्ये पारनेर १.३० पर्यंत चे मतदान एकूण मतदार ८९९२ पैकी ५५०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारपर्यंत ६१.१७% मतदानाची नोंद झाली.
नगरपंचायत निवडणूक तिरंगी असल्याने मतदानाचा टक्का वाढलेला आहे. सर्वच पक्षाच्या समर्थकांनी मतदान केंद्राबाहेर गर्दी केल्याचे दिसून आले.१३ प्रभागांसाठी एकूण १६ मतदान केंद्र आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.
राष्ट्रवादी, शिवसेना आणि शहर विकास आघाडी अशी तिरंगी लढत होत आहे. प्रचारादरम्यान पाणीप्रश्न, शहराचा विकास, त्याचबरोबर झालेल्या विकास कामांबाबत मतदान मागण्यात आले. मतदारांनी कोणत्या बाजूने कल दिला आहे हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.
दुपारी १:३० पर्यंत प्रभागनिहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे
हेही वाचा