अहमदनगर : आता महापालिका आयुक्तांचे बनावट व्हॉटस्अ‍ॅप अकाउंट | पुढारी

अहमदनगर : आता महापालिका आयुक्तांचे बनावट व्हॉटस्अ‍ॅप अकाउंट

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावर वापरात असलेल्या विविध अ‍ॅपवर बनावट अकाउंट तयार करून संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील सदस्य, नातेवाईक वा मित्रांकडून पैसे लाटण्याचे उद्योग आता सर्रास सुरू असल्याचे दिसत आहे. त्यातून आता उच्च पदावरील प्रशासकीय अधिकारीही सुटले नसल्याचे लमोर येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचे फेसबुकवर बनावट अकाउंट उघडल्याचे समोर आल्यानंतर आता महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या नावानेही बनावट व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट तयार झाल्याची बाब उघडकीस आली आहे.

आयुक्त डॉ. जावळे यांचा फोटो वापरून उघडण्यात आलेल्या या बनावट अकाउंटवरून डॉ. जावळे यांच्या परिचयातील व्यक्तींना मेसेज पाठवून पैशांची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे या बनावट व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटवरील मेसेजला कोणीही प्रतिसाद देऊ नये किंवा आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन आयुक्त डॉ.जावळे यांनी केले आहे. +998939811860 या विदेशी क्रमांकावरून पैशांची मागणी होत असून, नागरिकांनी या नंबरवरील मेसेजला कोणताही प्रतिसाद देऊ, नये असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा

सरकारी रुग्णालयांत केसपेपर, विविध चाचण्या होणार नि:शुल्क

लघुग्रह कसे बनतात आणि कसे होतात नष्ट?

वर्ल्डकपपूर्वी संघातील प्रयोग किती फायदेशीर?

Back to top button