कोल्हार : शिव व विष्णू यांचा स्वर सुखाच्या पलिकडचा | पुढारी

कोल्हार : शिव व विष्णू यांचा स्वर सुखाच्या पलिकडचा

कोल्हार(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : भगवंत परमात्म्याच्या हातातील वेणू भगवंताचा मनरूपी आहे. हा वेणू दुसरा तिसरा कोणी नसून बासरी आहे. वेणू वाजविणारा विष्णू व त्यातून निघणारा स्वर समाधी सुखाच्या पलीकडचा आहे, अशा प्रकारे श्रीकृष्णाच्या हातातील वेणूचे वर्णन महंत रामगिरी यांनी केले. श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपूर येथे श्रीमद् भागवत कथेचे पाचवे पुष्प गुंफताना रामगिरी महाराज बोलत होते. चौथ्या पुष्पात महंत रामगिरी यांनी श्रीकृष्ण जन्माची कथा सांगितली तर पाचव्या पुष्पात श्रीकृष्ण भगवंताच्या चौर्य लीला, रासलीला, कालिया मर्दन पुतना मावशीचा वध, गोवर्धन लीला आदी श्रीकृष्णाच्या विविध लिलांचे प्रसंग सादर करून भाविकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी गोवर्धन पर्वत लीला हा जीवंत देखावा सादर करण्यात आला. कथेप्रसंगी वृंदावन येथील कृष्णकुमार यांनी सादर केलेल्या शिवतांडव नृत्याला टाळ्याच्या गजरात दाद दिली.

भगवंताच्या वेणूचे महत्त्व विशद करताना रामगिरी म्हणाले, पृथ्वीच्या पलीकडच अमृत म्हणजे वेणूचे स्वर आहे. भगवंताने बासरी वाजवली तेव्हा गोवर्धन पर्वत वाहता झाला. गोपिका म्हणाल्या हे गोवर्धनाचे झरे नाही, तर आनंदाश्रू आहेत. या यमुनेवर उठलेले तरंग जणू यमुना तरंगरूपी हाताने भगवंताला आलिंगन देत आहे. वेणूचा स्वर ऐकून गायींच्या सडातून दुधाच्या धारा वाहू लागल्या. या दुधाच्या धारेचे प्रवाह या यमुनेत वाहू लागले. यमुनेची काळी धार व दुधाचे शुभ्र प्रवाह म्हणजे जणू काळा श्रीकृष्ण व गोरी राधा असे सुंदर वर्णन केले.

गोपिका चीर हरणाचा प्रसंग सांगताना ते म्हणाले, श्रीकृष्ण भगवंताने परस्त्रीचे ( गोपिका) वस्त्र पळविले. परंतु तसे नसून श्रीकृष्ण भगवंताच्या दर्शनासाठी गोपिका सतत व्याकुळ असत. श्रीकृष्ण भगवंताला आपलेसे करून घेण्यासाठी गोपिकांनी कात्यायनी मातेकडे प्रार्थना केली. ज्या गोपिका श्रीकृष्ण भगवंताला आपलं करून घेण्यासाठी प्रार्थना करतात. त्या गोपिकांना परस्री म्हणणे निरर्थक आहे. याबाबत त्यांनी रामायणातील सीता स्वयंवरापूर्वीचा एक दाखला देऊन गोपिका परस्त्री नसल्याचा पुनरुच्चार केला.

पुतना मावशीचे शरीर 36 तत्वांचे होते. अविद्यारूपी पुतना म्हणजे अज्ञानरूपी शरीर पुतनाच्या वधानंतर तिचा दाह संस्कार केला. तेव्हा त्या अग्नीचा सुगंध येऊ लागला. असे सांगून श्रीपुरुष आत्म्याचे धर्म नाही देहाचे धर्म आहेत. इंद्रयागाद्वारे मेघाला संतुष्ट केले तर पर्जन्यवृष्टी होते, असे ते म्हणाले. पाचव्या पुष्पात सादर झालेल्या गोवर्धन पर्वत जीवंत देखाव्यात साईराज श्रीकांत खर्डे बाल कृष्ण साकारला तर जयराज संतोष खर्डे, साईराज खर्डे, संस्कार खर्डे, राम शेळके हे कृष्णाचे सवंगड्याची भूमिका साकारली. भागवत कथेला दिवसोंदिवस गर्दी होत आहे.

हेही वाचा

पुणे : पेन्शनच्या नादात गमाविले सात लाख

अहमदनगर : महापालिकेत मानधनावर नेमणार 17 अभियंते

पुणे : पेन्शनच्या नादात गमाविले सात लाख

Back to top button