राहुरी : बेकायदेशीर वाळू वाहणारा डंपर पकडला

file photo
file photo
Published on
Updated on

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील प्रवरा नदी पात्रातून बेकायदेशीर अवैधरित्या शासनाच्या मालकीची वाळू चोरून वाहतूक करताना श्रीरामपुरच्या पोलिस उपाधीक्षक यांच्या पथकाने विना क्रमांकाचा तीन ब्रास वाळू व डंपर ताब्यात घेऊन चालकाला जेरबंद केले आहे. डंपर मालक दिपक बबन लाटे हा पसार झाला असल्याचे पोलिस सुत्रांकडून समजले आहे.

दिनांक 24 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजे दरम्यान प्रवरा नदी पात्रातून बेकायदेशीररित्या शासनाच्या मालकीची डंपरमध्ये तीन ब्रास वाळू वाहतूक करत असताना पोलिस उपाधीक्षकाच्या पथकाने देवळाली प्रवरा कारखाना जाणारे रोडने होले वस्ती परिसरात सदर डंपर पकडला. या बाबत पोलिस हवालदार सुनील लक्ष्मण शिंदे यांच्या फिर्यादीवरून सतीश रावसाहेब कुदनर (वय 32, रा. पिंपळगाव फुणगी, ता. राहुरी) तसेच दिपक बबन लाटे (रा. चिंचोली, ता. राहुरी) या दोघांवर अवैध गौण खनिज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रवरा नदीपात्रात महसूल व पोलिस प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करत सर्रासपणे वाळू उपसा केला जात आहे. पकडलेला डंपर हा दिपक लाटे या वाळू तस्कराचा असुन त्याच्यावर यापुर्वीचे वाळू चोरीचे गुन्हे दाखल असुन लाटे याच्यावर यापुर्वीच तडीपारीची कारवाई झालेली आहे.तर आता पोलिस प्रशासन पुन्हा काय कारवाई करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले असुन पोलिस व महसूल काय कारवाई करते याकडे लक्ष आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news