अहमदनगरमधून 365 गुंड तडीपार; पोलिस प्रशासन सज्ज

अहमदनगरमधून 365 गुंड तडीपार; पोलिस प्रशासन सज्ज
Published on
Updated on

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : शहरात गत आठवडा भरापासून मुस्लिम धर्मियांच्या मोहरम सणाला सुरूवात झाली असून, मोठ्या उत्साहात मोहरम सण साजरा होत आहे. मोहरम काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रेकॉर्डवरील 365 गुंडांना पोलिसांनी तडीपार केले आहे. तसेच, कोतवाली, तोफखाना, भिंगार या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 296 समाजकंटकांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. मिरवणुकीवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार असून 105 ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. नगरमधील मोहरम देशातील तिसर्‍या क्रमांकाचा आहे. त्यामुळे या मोहरमला विशेष महत्त्व असते.

मोहरम मिरवणुकीत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, गत काही दिवसांपूर्वी धार्मिक वातावरण बिघडविण्याच्या घटना नगर शहरात घडल्याने पोलिस प्रशासनाकडून मोहरम मिरवणुकीवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. शुक्रवारी (दि.28) रात्री 12 वाजता कत्तलची रात मिरवणूक काढण्यात येणार असून, शनिवारी (दि.29) दुपारी 12 वाजता मोहरम उत्सव विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.

शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतून 137, तोफखाना 148, भिंगार 80 अशा 365 समाजकंटकांना तडीपार करण्यात आले तर 296 समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मिरवणूक मार्गावर 105 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच, शांतता समिती व मोहल्ला कमिटीच्या बैठका घेऊन मोहरम उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त

पोलिस अधीक्षक राकेश ओला व अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदशनाखाली चार पोलिस उपअधीक्षक, 24 पोलिस निरीक्षक, 50 सहायक पोलिस निरीक्षक, 800 पोलिस अंमलदार, दोन आरसीपी प्लाटून, दोन एसआरपी प्लाटून असा मोठा पोलिस बंदोबस्त असणार आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news