वाळकी : खून, खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस केले जेरबंद | पुढारी

वाळकी : खून, खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस केले जेरबंद

वाळकी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : येथील लोखंडे कुटुंबाला खंडणी मागून मारहाण करीत नाथा ठकाराम लोखंडे (वय 49, रा. वाळकी ता.नगर) यांचा खून केल्याच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी विश्वजीत कासार याचा हस्तक अशोक उर्फ सोनू गुंड याला नगर तालुका पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले आहे. आरोपी गुंड हा गेल्या तीन महिन्यांपासून फरार होता.

वाळकीतील कासार मळा परिसरात 30 एप्रिल 2023 रोजी दुपारी 4.15 च्या सुमारास ही घटना घडली होती. याबाबत मयत नाथा ठकाराम लोखंडे यांचा मुलगा अनुराज नाथा लोखंडे याने नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून इंद्रजित रमेश कासार, शुभम उर्फ भोले जनार्धन भालसिंग, विश्वजीत रमेश कासार व अशोक उर्फ सोनू गुंड (सर्व रा.वाळकी ता.नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील इंद्रजित कासार, शुभम भालसिंग या दोघांना ताब्यात घेतले होते. तर, विश्वजित कासार व अशोक गुंड हे फरार होते.

यातील अशोक गुंड हा पुणे येथून केडगाव परिसरामध्ये येणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना मिहाली. त्यांनी उपनिरीक्षक युवराज चव्हाण, सुभाष थोरात, कमलेश पाथरुट, संभाजी बोराडे, राजू खेडकर, विक्रांत भालसिंग यांच्या पथकाला कारवाईसाठी पाठविले. हे पथक केडगाव परिसरातध्ये सापळा लावून थांबले.

थोड्याच वेळात आरोपी गुंड तोंडाला रूमाल बांधून येताना दिसला. पथकाने त्यास पकडले. त्याला न्यायालयामध्ये हजर केले असता, चार दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे. हा आरोपी मोक्का गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपी विश्वजीत कासार (रा. वाळकी) याचा मुख्य हस्तक असून, त्याच्यावर यापूर्वी देखील खंडणी मागणे, मारहाण करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा

पिंपरी : पंतप्रधान आवास योजना; अर्ज करण्यास चारच दिवस

आधी टॉवेल गुंडाळून पोझ आता नेहा मलिकची डीपनेक ड्रेसमध्ये हॉट पोझ

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प कार्यान्वित

Back to top button