भाजपचे फोडाफोडीचे राजकारण लोकशाहीला घातक : बाळासाहेब थोरात | पुढारी

भाजपचे फोडाफोडीचे राजकारण लोकशाहीला घातक : बाळासाहेब थोरात

संगमनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: संपूर्ण देशामध्ये भाजप धर्माच्या नावाखाली राजकारण करत आहे. त्यांनी धर्माच्या नावाखाली राज्यात शिवसेना पक्ष फोडला त्या पाठोपाठ राष्ट्रवादीही फोडली. भाजपचे हे फोडाफोडीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आबाळासाहेब थोरात यांनी केली.

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील रणखांबवाडी, कुंभारवाडी, वरवंडी, दरेवाडी ते कवठे मलकापूर डांबरीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर ,माजी जि. प. सदस्य अजय फटांगरे, थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर, मांडवेचे माजी उपसरपंच भाऊसाहेब डोलनर, युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव सचिन खेमनर, आण्णासाहेब कुदनर, जय राम ढेरंगे, आदींसह पठार भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून तालुक्यासह पठार भागातील विविध रस्त्यांसाठी निधी मंजूर करून घेतला होता. मात्र, सरकार बदलले आणि नव्या सरकारने मंजूर नवीन कामांच्या निधीला स्थगिती दिली. या स्थगितीबाबत आपण सातत्याने विधान भवनात आवाज उठविला. त्यानंतर सध्याच्या सरकारने स्थगिती उठवली असल्यामुळे ही कामे आता वेगाने सुरू होणार आहेत. आपण कायम विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम केल्याने सत्ताधारी व विरोधातील मंत्रीही आपला सन्मान करतात. त्याला फक्त काही जण अपवाद आहेत, असे देखील थोरात म्हणाले. भाजप सरकारच्या काळात संपूर्ण देशात वाढलेली बेरोजगारी आणि वाढती महागाई यावर देशातील जनता नाराज असून मणिपूरमध्ये घडलेली घटना ही संपूर्ण मानव जातीसाठी अत्यंत वेदनादायी आहे. त्यामुळे देशात अस्थिर वातावरण असून आगामी काळ हा काँग्रेसचाच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा:

शिर्डीत नाईट लँडिंग सेवेवरून आ. थोरातांनी धरले धारेवर!

अहमदनगर जिल्ह्यात अडीच लाख बेरोजगार तरुण

अहमदनगर : भावाकडून अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती

 

Back to top button