अहमदनगर : इमामपूर घाटात ट्रक 200 फूट खोल दरीत कोसळला | पुढारी

अहमदनगर : इमामपूर घाटात ट्रक 200 फूट खोल दरीत कोसळला

अहमदनगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इमामपूर घाटात सुमारे 200 फूट खोल दरीत ट्रक कोसळला. ही घटना गुरूवारी (दि.20) सकाळी घडली. दैव बलवत्तर म्हणून ट्रकमधील दोघेजण वाचले आहेत. नगरकडे येत असलेला ट्रक (एमएच 50 एन 1299) इमामपूर घाट चढून शेवटच्या वळणावर आला असता चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रक पाठीमागे जात सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळला.

ट्रकमधील मोहन भाऊ जाधव (वय 52, रा. बाबरवाडी ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर) व संतोष महिपती (रा.भोर पाडळी, जि.कोल्हापूर) हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. हा ट्रक सिल्लोड येथून कापूस गठ्ठे भरून कोल्हापूरकडे जात असताना इमामपूर घाटात हा अपघात घडला. अपघातामध्ये ट्रकचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

हेही वाचा

डबक्यांमुळे वाढली लेप्टोस्पायरोसिसची भीती

खारघर दुर्घटनेचा चौकशी अहवाल 15 दिवसांत सभागृहासमोर ठेवा : जयंत पाटील

भारतीय उद्योगांपुढे आता निर्यातीचे मोठे संकट

Back to top button