भाजपच्या उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी लंघे; तालुक्यात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत | पुढारी

भाजपच्या उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी लंघे; तालुक्यात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

नेवासा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांची नगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे नेवासा तालुक्यात ठिकठिकाणी जल्लोष करून स्वागत करण्यात आले. नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील रहिवासी असलेल्या विठ्ठलराव लंघे यांनी जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाच्या कार्यकाळात तालुक्यात संघटना बळकटीसाठी मोठे काम केलेले आहे. त्यांच्या कन्या व कुकाणा जिल्हा परिषद सदस्या तेजश्री लंघे यांच्या माध्यमातून तालुक्यात विविध विकासकामांना गती दिलेली आहे.

भाजपा नेतृत्वाने त्यांचे काम लक्षात घेऊनच लंघे यांच्यावर नगर उत्तर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. नेवासा तालुक्यात या निवडीचे वृत्त समजताच भाजपा कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला. शिरसगावमध्ये फटाके फोडून गुलाल उधळून आनंद व्यक्त करण्यात आला. ग्रामस्थांनी व कार्यकर्त्यांनी दत्तात्रय पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली लंघे यांचा सत्कार केला. भेंडा येथे भाजपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांच्यासह माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व सहकार्‍यांनी लंघे यांचा सत्कार केला. तसेच, उस्थळ दुमाला, भालगाव, गोधेगाव, वरखेड, वाकडी, रामडोह, खामगाव आदि ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

नेवासा शहरात भाजपाच्या वतीने लंघे यांचा भाजपा कार्यालयात सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य निरंजन डहाळे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, शहराध्यक्ष मनोज पारखे, माजी तालुकाध्यक्ष माऊली पेचे, नगरसेवक सुनील वाघ, राजेंद्र मुथ्था, अजित नरूला, सतीश गायके, अशोक टेकने, बाळासाहेब क्षीरसागर, राजेंद्र कडू, प्रतीक शेजूळ, अनिल परदेशी, श्रीकांत बर्वे, आदिनाथ पटारे, आप्पा गायकवाड, कृष्णा डहाळे, राहुल पवार उपस्थित होते.

हेही वाचा

’स्टुडंट इनोव्हेशन’ला प्रोत्साहन ; कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन

Irshalwadi landslide : महाड तळीयेची खालापुरात पुनरावृत्ती; इर्शाळवाडीवर दरड कोसळून २०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली

Irshalwadi landslide : इर्शाळवाडी दरड दुर्घटना : ७५ जणांना बाहेर काढण्यात यश : उपमुख्‍यमंत्री फडणवीस

Back to top button