कोळपेवाडी : अतिक्रमण नियमानुकूलासाठी मुदतीत अर्ज करावे | पुढारी

कोळपेवाडी : अतिक्रमण नियमानुकूलासाठी मुदतीत अर्ज करावे

कोळपेवाडी; पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव शहरातील नगरपरिषद हद्दीतील सर्व्हे नं. 113 (भाग) व 114 (भाग) मधील शासकीय जागेवरील वास्तव्यास असणार्‍या नागरिकांनी जागा नियमानुकूल करण्यासाठी सर्वेक्षणामध्ये अर्ज दाखल केलेले नाहीत. अशा नागरिकांनी तातडीने आपले अर्ज कोपरगाव नगरपरिषदेकडे दाखल करून अतिक्रमित जागेचे सात बारा उतारे नावावर होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

नगरपरिषद हद्दीतील लक्ष्मीनगर भागातील शासकीय जागेवरील नागरिकांची जागा नियमानुकूल करून या नागरिकांना त्यांच्या नावचे उतारे मिळावे, जागा नियमानुकूल करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची अंतिम कार्यवाही नगरपरिषदेकडून सुरु आहे. परंतु अजूनही नागरिकांनी जागा नियमानुकूल करण्यासाठी सर्वेक्षणा मध्ये आपले अर्ज दाखल केलेले नाहीत.

ज्या नागरिकांनी अर्ज दाखल केलेले आहेत अशा नागरिकांच्या नावाची यादी नगरपरिषदेने प्रसिद्ध केली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये शासकीय जागेवरील वास्तव्यास असणार्‍या नागरिकांनी आपले नाव असल्याची खात्री करून घ्यावी. ज्या नागरिकांचे यादीमध्ये नाव आलेले नाही, त्या नागरिकांनी तात्काळ त्यांच्या जागा नियामानुकूल करण्यासाठी लेखी अर्ज दि. 25 जुलै ते 5 ऑगस्ट पर्यंत कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रधानमंत्री आवास योजना कक्षात जमा करावेत.

शासकीय जागेवर वास्तव्यास असणार्‍या कोणत्याही नागरिकांची जागा नियमानुकूल होण्यापासून राहणार नाही यासाठी ज्या नागरिकांनी आजपर्यंत े अर्ज दाखल केलेले नाही. अशा नागरिकांनी तातडीने आपले अर्ज सदरच्या मुदतीत दाखल करावे व कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास कोपरगाव जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन आमदार आशुतोष काळे कोपरगाव शहरातील नागराीकांना केले आहे.

हेही वाचा

Irshalwadi landslide : इर्शाळवाडी दरड दुर्घटना मन पिळवटून टाकणारी; उपमुख्यमंत्री अजित पवार

ह्दयद्रावक! कोल्हापूरमध्‍ये दुचाकीला अपघात, आईसमोरच बालिकेचा अंत

संगमनेर : युरिया खरेदीसाठी औषधांची सक्ती थांबवावी; भाजपचा आंदोलनाचा इशारा

Back to top button