नगर : राशीनच्या व्यापार्‍यांना भिगवण रस्त्यावर जागा | पुढारी

नगर : राशीनच्या व्यापार्‍यांना भिगवण रस्त्यावर जागा

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  राशीन येथील व्यापार्‍यांचा गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रलंबित असलेला जागेचा प्रश्न कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाने सोडविला आहे. भिगवण रोड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेमध्ये राशीन परिसरातील व इतर सर्व व्यापार्‍यांना जागा देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला. कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात सोमवारी राशीन येथल व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली.

सभापती काकासाहेब तापकीर, उपसभापती अभय पाटील, नंदराम नवले, प्रपुल्ल नेवसे, विजय भंडारी यांच्यासह सर्व संचालक व मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून राशीन येथील आडत व्यापार्‍यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून घेण्यात आलेली होती. मात्र, प्रत्येक वेळी काही अडचणींमुळे हा प्रश्न मागील 25 वर्षांपासून प्रलंबित होता. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राशीन बाजारात सर्वत्र एकत्र व्यापार न होता व्यापारी विखुरलेले राहत. यामुळे शेतकर्‍यांना प्रत्येक व्यापार्‍याच्या आडतीवर जावे लागत होते.

सभापती तापकीर उपसभापती पाटील, नंदराम नवले, प्रपुल्ल नेवसे, विजय भंडारी यांच्यासह सर्व संचालकांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी व्यापार्‍यांच्या अडचणी व समस्या त्यांनी ऐकून घेतल्या आणि त्याच ठिकाणी त्या सोडविण्याचा निर्णय संचालक मंडळाने एकत्रित घेतला. त्यामुळे सर्व व्यापार्‍यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. व्यापारी संचालक प्रफुल्ल नेवसे म्हणाले, राशीन येथील व्यापारी बांधवांचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. अनेक बैठका झाल्या, मात्र याबाबत निर्णय होत नव्हता. मात्र, आज झालेल्या बैठकीत संचालक मंडळ व व्यापारी यांच्यात समन्वय झाला. हा प्रश्न सुटल्यामुळे सर्वांना आनंद झाला आहे.

हे ही वाचा :

मानहानी प्रकरण : राहुल गांधींच्‍या याचिकेवर सर्वोच्‍च न्‍यायालयात शुक्रवारी सुनावणी

पावसाळ्यात आहार, व्यायामात हवी सुसूत्रता !

 

Back to top button