

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : महसूल व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दुधाचे दर हे कमीत कमी प्रती लिटर 34 रुपये करण्याचा निर्णय 21 जुलैपासून अमलात आणण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील शेतकर्यांकडून विखे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालण्यात आला. या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकर्यांना फायदा होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व दूध उत्पादक शेतकर्यांच्या भावनांचा विचार केल्याबद्दल रांजणगाव मशीद येथे शेतकर्यांनी जिल्हा परिषदेचे जलसंधारण समितीचे सदस्य राहुल शिंदे व दूध उत्पादक नेते संतोष सरोदे यांच्या नेतृत्वाखाली दुग्धाभिषेक घालण्यात आला.
यावेळी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हॉईस चेअरमन, सर्व संचालक, तसेच यावेळी दूध उत्पादक शेतकरी बापूसाहेब जवक, अनिल जवक, बाळासाहेब जवक, सुखदेव सरोदे, माणिक काळे, कैलास शिंदे, हनुमंत जवक, चांगदेव जवक, दत्तात्रय मगर, शिवदास मेहत्रे व शेतकरी उपस्थित होते.
हे ही वाचा :