नगर : बसस्थानक फलाटावर कार चढली | पुढारी

नगर : बसस्थानक फलाटावर कार चढली

कोल्हार (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : एसटी बस स्थानकाच्या आवारात वेगाने आलेली कार बस स्थानकाच्या फलाटावर चढल्याने झालेल्या अपघातात दोन महिला जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि. 6) दुपारी घडली. बाभळेश्वर बस स्थानकात गुरुवारी दुपारच्यावेळी एक कार (एमएच 12 यु डब्ल्यू 6679) वेगात बस स्थानकाच्या आवारात आली. या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने फलाटाजवळ लावलेल्या मोटरसायकलला धडकून एक फूट उंच असलेल्या प्लॅटफॉर्मवर चढली. या फलटावर काही महिला बसची वाट पाहत होत्या. या महिलांनाही या कारने ठोकारले. यामध्ये इंदुबाई गोंडे (वय 70, रा. बाभळेश्वर) तसेच आणखी एक महिला जखमी झाली. दुसर्‍या जखमी झालेल्या महिलेचे नाव समजू शकले नाही.

घटनेनंतर बाभळेश्वर बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक आरिफ शेख यांनी घटना घडल्यानंतर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. जखमी महिलांना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. जखमी इंदुबाई गोंडे या भेंडा येथे बहिणीला भेटण्यासाठी चालल्या होत्या. या बस स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. ही कार मोटरसायकल ला धडकून थांबली नसती तर कदाचित मोठी दुर्घटना घडून मोठी जीवितहानी झाली असती. कारचालक गव्हाणे ( पूर्ण नाव माहित नाही) हे कार चालवीत असल्याचे कळते.

हे ही वाचा : 

आरटीई प्रवेशासाठी आज अखेरची मुदत

Rahul Gandhi defamation case | राहुल गांधी यांची खासदारकी रद्दच, शिक्षेला स्थगिती देण्यास गुजरात हायकोर्टाचा नकार

 

Back to top button