नगर : पुढारी वृत्तसेवा : महाालिकेच्या घनकचरा विभागाकडून चार कोटी रुपयांचा निधी खर्च झाला असून सात लाखांचा निधी बाकी आहे, असे उपयोगिता प्रमाणपत्र विभागाने शासनाकडे सादर केले. प्रत्यक्षात चार कोटी खर्चच झाले नसल्याचे ऑनलाईन प्रणालीवर उघडकीस आले. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी घनकचरा विभागप्रमुखांसह स्वच्छता निरीक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.
महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त यशवंत डांगे यांची बदली झाल्यानंतर घनकचरा विभागाचे नियंत्रण अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्याकडे सोपविण्यात आले. सध्या विभागप्रमुखाचा 'प्रभार' स्वच्छता निरीक्षक किशोर देशमुख यांच्याकडे आहे.
या विभागाला बांधकामासह अन्य कामांसाठी शासनाकडून चार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तो निधी संपूर्णपणे खर्च झाला असून, त्यातील अवघे सात लाख रुपये बाकी असल्याचे उपयोगिता प्रमाणपत्र घनकचरा विभागाने तयार केले. त्या पत्रासह अन्य कागदपत्रे व अहवाल सादर करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे मुंबईला गेले होते. तेथे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करताना ऑनलाईन प्रणालीवर पडताळणी करण्यात आली. त्यात घनकचरा विभागाला प्राप्त झालेले चार कोटी खर्च न झाल्याचे दिसत होते. त्यानंतर हा प्रकार समोर आला.
त्यामुळे नेमका हा प्रकार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे डॉ. पठारे यांनी प्रभारी घनकचरा विभागप्रमुख किशोर देशमुख, स्वच्छता निरीक्षक परीक्षित बीडकर यांना कारणे दाखवा नोटिसा काढल्या असून, त्यांनी रीतसर खुलासा करावा, असा आदेश दिला आहे.
…ते फोनवर सांगता येणार नाही!
मुंबईत गेलेल्या अधिकार्यांनी चौकशीसाठी संबंधित कनिष्ठ अधिकार्यांना फोन करून विचारणा केली. उपयोगिता प्रमाणपत्र आणि ऑनलाईन प्रणालीतील आकडेवारीत तफावत दिसत असल्याचे सांगितले. त्यावर संबंधित अधिकार्याने सांगितले, साहेब, ते फोनवर बोलता येणार नाही!
उपयोगिता प्रमाणपत्रातील खर्चाच्या तपशिलामध्ये तफावत आढळल्याने संबंधित अधिकार्यांना कारणे दाखवा नोटिसा काढल्या आहेत.
– डॉ. प्रदीप पठारे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
हे ही वाचा :