श्रीरामपूर/माळवाडगाव : पुढारी वृत्तसेवा : पहिल्या मृग नक्षत्रा पाठोपाठ आद्रा नक्षत्रही कोरडेच निघून चालले असताना पुनर्वसु नक्षत्राच्या पुर्व संध्येला जाता जाता आद्रा नक्षत्राने श्रीरामपूर तालुक्याच्या पुर्व गोदाकाठ परिसरात तब्बल एक महिन्याच्या प्रतिक्षेनंतर दुपारनंतर ढगांच्या कडकडाटात जोरदार सलामी दिल्याने शेत शिवारातून खळखळ पाणी वाहु लागल्याने शेतकर्यात समाधान व्यक्त होत आहे. वैजापूर-श्रीरामपूर तालुका हद्द समजल्या जाणार्या गोदावरी नदी पलिकडील वैजापूर पट्ट्यात काल मंगळवारी सर्वदूर जोरदार पाऊस झाला. परंतु श्रीरामपूर तालुक्यातील गोदकाठची गावे पावसाच्या प्रतीक्षेत होती.
आज ना उद्या आपल्याकडे पाऊस नक्की येईल या प्रतिक्षेत गोदाकाठावरील गावोगावचे शेतकरी होते. हा अंदाज खरा ठरल्याने शेतकर्यांच्या आनंदास पारावार उरला नाही. खरिपातील सोयाबीन, मका बाजरी कुठलीच पेरणी झालेली नव्हती. पाण्याची सोय असणार्या शेतामध्ये अवघ्या दहा टक्के क्षेत्रात कपाशी लागवड झाली होती. आता कपाशी पाठोपाठ सोयाबीन, मका, पेरणी निश्चित होणार आहे. आद्रा नक्षत्राच्या अखेरच्या दिवशीच्या या हंगामातील पहिल्याच पावसाने मागील कसर काढली. वादळ वार्यावीना ढगांच्या जोरदार कडकडाटात. शांततेत बरसलेल्या पावसांत कुठंही वीज कोसळल्याची अथवा नुकसानीची खबर नाही.
पाऊस झाल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
गिरनाई नदीला आला पूर
आद्रा नक्षत्राच्या अखेरच्या दिवशीच्या अन् या पावसाळ्यातील पहिल्याच पावसाने महाकांळवाडगांव, खानापूर शिवारातून भामाठान येथे गोदावरीस जाऊन मिळणार्या गिरनाई नदीला पुर आला आहे.
हे ही वाचा :