राज्याच्या काही भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता | पुढारी

राज्याच्या काही भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील तुरळक भागांत 9 जुलैपर्यंत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, जुलै महिन्याचा आठवडा संपत आली, तरी पावसाने अजूनही जोर धरलेला नाही. परिणामी, राज्यातील बहुतांश भागांतील पेरण्या खोळंबल्या आहेत.

मान्सूनने संपूर्ण देश व्यापला आहे. देशाच्या सर्वच भागांत जुलै महिना सुरू होऊनही पावसाचा जोर वाढलेला नाही. मान्सूनचा ट्रफ अजूनही दक्षिण भागाकडेच आहे; तर मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती आहे. मात्र, त्याची तीव्रता अतिशय कमी आहे. दक्षिण गुजरात ते उत्तर केरळच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. यामुळे राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल; तर उर्वरित भागात पावसाचा जोर अतिशय कमी राहील. एकूणच 10 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर थोडा कमीच राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हेही वाचा

पुणे : हवेली-3 चे प्रभारी दुय्यम निबंधक अभिजित विधाते निलंबित

छगन भुजबळ विरोधात शरद पवार मैदानात; 8 जुलैला पहिली सभा येवल्यात

नगरचा ऋषिकेश कडूस ओबीसीत राज्यात प्रथम

Back to top button