नगर : 365 दिवसांत 370 गडकिल्ले सर ; सुबोध निघाला माऊंट एव्हरेस्ट शिखरावर | पुढारी

नगर : 365 दिवसांत 370 गडकिल्ले सर ; सुबोध निघाला माऊंट एव्हरेस्ट शिखरावर

नेवासा फाटा : पुढारी वृत्तसेवा : 365 दिवसांत 370 गडकिल्ले सर करून आता एव्हरेस्ट शिखरावर निघालेला सुबोध गांगुर्डे याचे नेवासा फाटा येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. माणसाने जिद्दीच्या जोरावर आपले यशाचे शिखर साध्य करण्यासाठी, मनी बाळगलेले स्वप्न प्रत्यक्षात साध्य करण्यासाठी, सतत समाजात धडपड असणारे लोक आपल्या स्वप्नांपासून कधीही मागे रहात नाहीत, हे धेयवेड्या रायगड जिल्ह्यातील रोहा येथील चोवीस वर्षीय युवक सुबोध गांगुर्डे याने सिद्ध केले आहे. 365 दिवसांत 370 गडकिल्ले सर करून स्वराज्याची भगवी पताका हाती घेऊन ती जगातील सर्वोच्च शिखर असणार्‍या माऊंट एव्हरेस्टवर फडकविण्यासाठी हा ध्येयवेडा सायकलपटू निघाला आहे.

सायकलपटू सुबोधचे नेवासा फाटा येथे आगमन होताच, कैलास गायकवाड, समर्पन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. करण घुले, सोनई येथील माधवबाग आयुर्वेद केंद्राचे प्रमुख डॉ.पार्थ मरकड, व्यंगचिञकार भरतकुमार उदावंत, अल्ताफ शेख, राजेंद्र वाघमारे, ज्ञानेश सिन्नरकर, चंद्रकांत दरंदले, संदीप गाडेकर, सतीश उदावंत, भरत पटेल, किशोर मगर, संदीप क्षीरसागर, गणेश नवगिरे, राजू बनबेरू, माधव नन्नवरे आदींनी स्वागत करून, त्याला अर्थिक मदतही दिली.

हे ही वाचा : 

Sharad Pawar : नवी दिल्‍ली महापालिकेने शरद पवारांचे पोस्टर्स, होर्डिंग्स हटवले

स्वायत्त अभियांत्रिकीमध्ये यंदापासूनच नवीन धोरण

Back to top button