संगमनेर: बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालिका गंभीर जखमी | पुढारी

संगमनेर: बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालिका गंभीर जखमी

संगमनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: गिनी गवतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक येऊन ईश्वरी विजय बालोडे या पाच वर्षीय बालिकेवर हल्लाचढवत तिच्या डोक्याला चावा घेत गंभीररित्या जखमी केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील खांडगाव शिवारातील बिरोबा माळ या ठिकाणी मंगळवारी घडली.

संगमनेर तालुक्यातील खांडगावच्या बिरोबा माळ परिसरात विजय बालोडे हे आपल्या कुटुंबीयांसह राहत आहेत. ईश्‍वरी ही घरासमोरील अंगणात खेळत होती. तर तिची आई ही समोरील शेतात घास कापत होती. ईश्‍वरी ही शेतातून घराकडे येत होती. दरम्यान जवळच असलेल्या गिन्नी गवतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला केला. त्यामुळे ती मोठ्याने ओरडू लागली. तिच्या ओरडण्याचा आवाज आईला आला. ईश्‍वरीच्या आवाजाच्या दिशेने तिच्या आईने धाव घेतली असता बिबट्याने ईश्वरीला उचलले असल्याचे दृश्य पहिले आणि ती खूप घाबरली होती. तीनेही मोठ्याने आरडा ओरड सुरू केली असता आसपासचे नागरिक धावत घटनास्थळी पोहचले. झालेल्या गर्दीमुळे बिबट्याने मुलीला सोडून देत शेताच्या दिशेने धुम ठोकली.

बिबट्याने ईश्वरीवरच्या डोक्याला, मानेला, गालाला आणि पोटाला चावे घेतले आहेत. ठीक ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या. त्यामुळे तिच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावरती रक्तस्राव होत होता म्हणून तिला पुढील उपचारासाठी तात्काळ संगमनेर येथील मेडिकेव्हर या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती माजी सरपंच सोमनाथ गुंजाळ, डॉ सुरेश बालोडे, मोहन गुंजाळ यांनी तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. ही माहिती मिळताच उपविभागीय वनाधिकारी संदीप पाटील, वन परीक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे, वन परिमंडल अधिकारी संगीता कोंडार, वनरक्षक आर. एस. कोळी यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला.

हेही वाचा:

Sharad Pawar: माझा फोटो वापरू नका: शरद पवारांच्या इशाऱ्याने बंडखोरांना धक्का

President Draupadi Murmu :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या गडचिरोली दौऱ्याची जय्यत तयारी

IDFC merge with IDFC First Bank | एचडीएफसी नंतर आता आणखी एका बँकेच्या विलीनीकरणाची घोषणा

 

Back to top button