नगर : संगमनेर दूध उत्पादकची निवडणूक बिनविरोध

नगर : संगमनेर दूध उत्पादकची निवडणूक बिनविरोध
Published on
Updated on

संगमनेर (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर विभाग दूध उत्पादक सोसायटीची निवडणुक याही वेळी बिनविरोध पार पडली आहे. . त्यामुळे याही वर्षी संस्थेने बिनविरोधची परंपरा कायम ठेवली आहे. संगमनेर विभाग दूध उत्पादक सोसायटीच्या संचालक मंडळाची मुदत संपली होती. त्यामुळे सन 2023 ते 2028 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी निवडणुका जाहीर झाली होती. या निवडणुकीमध्ये संचालक मंडळाच्या 17 जागांकरिता 41 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील 23 जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यानंतर निवडणूक निर्णयाधिकारी एम. जी. गाडे यांनी अनुसूचित जाती जमातीच्या पदासाठी राजेंद्र तुपे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची बिनवि रोध निवड झाली.

संस्थेचे मार्गदर्शक भाऊसाहेब कुटे यांनी सर्व उमेदवारांना विश्वासात घेत या दूध संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला. अखेर माघारीच्या शेवटच्या दिवशी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी प्रयत्न केले आणि अखेर कुटे त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
सर्वसाधारण गटातून दादासाहेब भाऊसाहेब कुटे पोपट अर्जुन आगलावे, मच्छिंद्र शंकर गुंजाळ, संभाजी दामू गुंजाळ, देविदास आप्पासाहेब जाधव, दत्तात्रय राधु गुंजाळ, नानासाहेब रावजी गुंजाळ, अशोक मुरली धर सातपुते, सुनील गुलाब कुटे, मंगेश रामभाऊ कांडेकर, गेनु गाण्याबापु कुटे, रंगनाथ भिमाजी पावबाके. महिला राखीव मधून बेबी उत्तम गुंजाळ, विजया भाऊसाहेब राऊत, इतर मागास प्रवर्गातून कैलास रामभाऊ घोडेकर, भटक्या विमुक्त जाती मधून नामदेव रामभाऊ शेरमाळे तसेच अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून राजेश केरू तुपे या 17 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असल्याची घोषणा निवडणूक निर्णयाधिकारी एम. जी. गाडे यांनी केली. त्यांना मदत म्हणून मॅनेजर जालिंदर पानसरे यांनी सहाय्य केले.

  स्पर्धेच्या काळात टिकण्यासाठी माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात आणि माजी आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्श नाखाली संस्थेने दूध उत्पादकांना चांगला बाजार भाव देत आहे. तसेच संस्थेचे चेअरमन दादासा हेब कुटे यांनी गेल्या 12 वर्षांपासून केले ल्या कारभारावर विश्वास ठेवल्यामुळेच ही निवडणूक बिनविरोध न करणे सर्वां च्या हिताचे असल्याचे संस्थेचे मार्गदर्शक आणि जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news