नगर : राळेगण थेरपाळमध्ये सशस्त्र दरोडा | पुढारी

नगर : राळेगण थेरपाळमध्ये सशस्त्र दरोडा

जवळा (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथे सशस्त्र दरोडा टाकून दरोडेखोरांनी वृद्धलेा मारहाणी करीत सव्वापाच लाखांचा ऐवज लांबविला. ही घटना काल पहाटे घडली. गुरुवारी रात्री एकच्या दरम्यान राळेगण थेरपाळ येथील भाऊ नाथा टकले व कुटुंबीय शेतीची कामे आटोपून झोपी गेले होते.. अचानक आलेल्या नऊ ते दहा दरोडेखोरांनी टकले यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील महिला व पुरुषांना लोखंडी टॉमी व लाकडी दांडक्याने मारहाण करीत चाळीस हजार रुपये रोख व सुमारे आठ तोळे सोने असा सव्वा पाच लाख रु चा ऐवज लांबविला.

नाथा टकले यांच्या 80 वर्षीय आई ठकाबाई नाथा टकले यांना मारहाण करीत त्यांच्या अंगावरील सोने ओरबाडले. त्यांचा पुतण्या सुभाष यासही पाठीत लोखंडी गजाने मारहाण केली. अर्धा ते एक तास चाललेल्या या थराराने टकले कुटुंब भयभित झाले. सदर घटनेची माहिती मिळाल्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी संपतराव भोसले यांनी घटनास्थळाला भेट देत परिस्थितीची पाहणी करून पुढील तपासाच्या दिशेने सूत्रे हलविली. पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना हजर होतानाच जवळ्यात दरोडेखोरांनी सलामी दिली. पारनेर मध्ये दरोड्याचे सत्र सुरूच आहे. पोलिसही तपास लावण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कामकाजावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा : 

देशात तब्बल सहा हजार कोटींची दूध पावडर पडून

पुणे : बँकेतील ग्राहकांना लुटणारी हरियाणाची टोळी जेरबंद

Back to top button