आश्वी : डोळ्यात मिरची पूड टाकून सोनाराला लुटले

आश्वी : डोळ्यात मिरची पूड टाकून सोनाराला लुटले

आश्वी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी परिसरात सोमवारी सायंकाळी 8 वाजल्याच्या सुमार दोन अज्ञात चोरट्यांनी सोनार प्रसाद पंडितराव नांदुरकर यांच्या डोळ्यात मिर्ची पुड टाकून 7 लाख 62 हजार 125 रुपये किमतीचे दागिन्यासह रोख रक्कम घेवून पलायन केल्याची घटना घडली. या घडनेने व्यापार्‍यासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, सोन्या चांदीचे व्यापारी प्रसाद नांदुरकर यांचे निमगावजाळी येथे सोनाराचे दुकान आहे. सोमवारी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास निमगावजाळी – गोगलगाव रस्त्याने घराच्या दिशेने जात होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकत त्यांना मारहाण केली व हातातील दागिन्यांची पिशवी घेऊन पोबारा केला .

पिशवीमध्ये 17 हजार रुपये किमंतीचे कानातले दोन जोड, 46 हजार 750 रुपये किमंतीचे चैन टॉप्स 4 जोड, 29 हजार 750 रुपये किमंतीचे पेडल, 51 हजार रुपये किमंतीचे सोन्याचे मणी, 38 हजार 250 रुपये किमंतीच्या कानातील बाळ्याचे 13 जोड, 25 हजार 500 रुपये किमंतीचे कानातील झुबे दोन जोड, 29 हजार 750 रुपये किमंतीच्या महिलांच्या 3 अंगठ्या, 25 हजार 500 रुपये किमंतीचे घुंगर टॉप्स 3 नग, 68 हजारांच्या मुरण्या 40 नग, 55 हजार 250 रुपये किंमतीची जुनी मोड गोळी, 32 हजार 500 रुपये किमंतीच्या महिला व पुरुषाच्या चांदीच्या 150 अंगठ्या, 1 लाख 45 हजार रुपये किमंतीच्या तोरड्याचे 150 जोड, 97 हजार 875 रुपये किमतीचे चांदीचे कडे व जोडले तसेच 1 लाख रुपये रोख असा एकून 7 लाख 62 हजार 125 रुपये किमंतीचा माल चोर्‍यांनी लंपास केला . याबाबबत आश्वी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संतोष भंडारे पुढील तपास करत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news