वाळकी : शेतकर्‍याचा ट्रॅक्टर चोरणारा पकडला | पुढारी

वाळकी : शेतकर्‍याचा ट्रॅक्टर चोरणारा पकडला

वाळकी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील चास गावच्या शिवारात निमगाव वाघा रोड राहणार्‍या शेतकर्‍याचा घरासमोर लावलेला महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर चोरून नेणार्‍या चोरट्याला नगर तालुका पोलिसांच्या पथकाने नगर एमआयडीसी परिसरातील चेतना कॉलनी येथून अटक केली. सचिन भास्कर जाधव (रा. निमगाव वाघा,ता.नगर) असे त्याचे नाव असून त्याने भाळवणी येथे विकलेला चोरीचा ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आला आहे.

मंदा सुर्यभान देवकर (रा. निमगाव वाघा रोड, चास, ता.नगर) यांनी दि.18 ऑक्टोबर 2022 रोजी नगर तालुका पोलिस ठाण्यात ट्रक्टर चोरीची फिर्याद दिली होती. तेव्हापासून पोलिस चोरट्याच्या मागावर होते. चोरी गेलेला ट्रॅक्टर सचिन भास्कर जाधव (रा. निमगाव वाघा, ता.नगर) याने चोरलेला आहे व तो सध्या एमआयडीसी येथील चेतना कॉलनी येथे राहत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पथकाने त्याला अटक केली. नगर तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी शिशिरकुमार देशमुख, उपनिरीक्षक युवराज चव्हाण, जगदीश जंबे, सुभाष थोरात, राहुल शिंदे, कमलेश पाथरुट, संभाजी बोराडे, राजू खेडकर, सोमनाथ वडणे यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा

अहमदनगर : राजकारणासाठी योजना बंद पाडू नका; संदेश कार्ले यांचा शिवाजी कर्डिले यांच्यावर पलटवार

सोलापूर : बाल दिंडीला जाण्यासाठी दुचाकी दिली नाही म्हणून मुलाने जीवन संपवले

स्पंज बाथचे अनेक फायदे, जाणून घ्या त्याविषयी

Back to top button