सुपा : वारकर्‍यांच्या सेवेसाठी सरसावले डॉक्टर | पुढारी

सुपा : वारकर्‍यांच्या सेवेसाठी सरसावले डॉक्टर

सुपा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यातील संत श्रेष्ठ निळोबाराय दिंडी सोहळ्यातील लाखो भाविक पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी उत्साह व आनंदात वारी करत असतात. या वारकर्‍यांच्या सेवेसाठी पारनेर तालुक्यातील डॉक्टर असोसिएशनने सेवेसाठी इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथे जाऊन वारकर्‍यांची निशुल्क सेवा केली. विठोबा, तुकाराम, ज्ञानोबांच्या अभंगांनी वारकरी दिंडी सोहळ्यात रंगून जातात. पायी चालताना अनेक वृद्धांना शारीरिक त्रासांना सामोर जावे लागते.

बर्‍याच वेळा वैद्यकीय विभागाची कमतरता भासते. दरवर्षी दिंडीच्या पाठोपाठ तालुक्यातून चार-पाच डॉक्टर अनेक वर्षांपासून रुग्णांची सेवा बजावतात. यावर्षी अनेक डॉक्टरांनी आपली वैद्यकीय सेवा पाच दिवस बंद ठेवून दिंडीतील वारकर्‍यांची सेवा करण्याचे ध्येय निश्चित केले. वारकर्‍यांमध्ये खरा विठ्ठल असे समजून 25 डॉक्टरांनी वारकर्‍यांची सेवा करण्यासाठी सरडेवाडी गाव गाठले. अनेक दिंड्यातील वारकर्‍यांची तपासणी केली. त्यात बीपी, शुगर, सांधेदुखी, अशा शारीरिक तपासण्या करून गोळ्या, औषधे देण्यात आले.

हेही वाचा

हडपसरच्या दस्तनोंदणी कार्यालयाचे स्थलांतर होणारच !

पाथर्डी तालुका : शेतकर्‍यांची बियाणे खरेदीसाठी झुंबड

पर्यटक अडकले वाहतूक कोंडीत ; सिंहगड, राजगडावर झुंबड

Back to top button