पाथर्डी तालुका : शेतकर्‍यांची बियाणे खरेदीसाठी झुंबड | पुढारी

पाथर्डी तालुका : शेतकर्‍यांची बियाणे खरेदीसाठी झुंबड

पाथर्डी तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी शहरासह तालुक्यात शनिवारी झालेल्या पावसाने शेतकरी सुखावले आहेत. खरीप पेरणीसाठी रविवारी शेतकर्‍यांनी बी बियाणे खरेदीसाठी कृषी सेवा दुकानांमध्ये गर्दी केली होती. पावसाने शहरातील सखल भागातील घरांमध्ये पाणी घुसले होते.मृग नक्षत्र संपल्यानंतरही पावसाने दडी मारली होती. शनिवारी सायंकाळी शहरात पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. पहिल्या पावसातच पाथर्डी नगरपरिषद हद्दीमधील गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने रहिवाशांच्या घरांमध्ये पावसाबरोबर गटाराचे पाणी गेल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले.पाथर्डी नगरपरिषदेकडून गटारांची स्वच्छता होत नाही.

त्यामुळे गटारांमध्ये अडकलेल्या घाणीमुळे पावसाचे पाणी गटारीतून वर आल्याने हे पाणी रस्त्यावर आले. शहरातील पोळा मारुती परिसरातील घरांमधून पाणी उपसण्यासाठी महिलांची तारांबळ उडाली होती. तसेच चिंचपूर रोडवरील काही घरांमध्येही गटारांचे पाणी शिरले. दरम्यान, पावसामुळे तालुक्यात शेतकर्‍यांनी पेरणीसाठी बी-बियाणे खरेदीसाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी केली होती.अजूनही काही शेतकरी पेरणी करण्यासाठी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

हेही वाचा

हडपसरच्या दस्तनोंदणी कार्यालयाचे स्थलांतर होणारच !

पर्यटक अडकले वाहतूक कोंडीत ; सिंहगड, राजगडावर झुंबड

नाशिक : दहा दिवसांत घरकुलाचे २५ हजार प्रस्ताव द्या; पालकमंत्री भुसेंचा अल्टिमेटम

Back to top button