राहुरी : मातीशी नाळ जोडल्याने जीवन आरोग्यदायी : विद्यापीठ कुलगुरू डॉ.पी.जी पाटील

राहुरी : मातीशी नाळ जोडल्याने जीवन आरोग्यदायी : विद्यापीठ कुलगुरू डॉ.पी.जी पाटील
Published on
Updated on

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : आपले आरोग्य जर चांगले असेल तर आपण सुखी जीवन जगू शकतो. याकरिता आहार आरोग्यदायी असणे गरजेचे आहे. रागावर नियंत्रण ठेवा. नेहमी लहान मुलांसारखे रहा. आपली नाळ नेहमी मातीशी जोडलेली राहिली तर आपली जीवनशैली आरोग्यदायी बनेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी केले.

राहुरी कृषि विद्यापीठात प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांना आरोग्य विषयी जागृत करण्यासाठी शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राच्या वतीने निरामय आरोग्य या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सेमीनार हॉल येथे करण्यात आले होते. यावेळी ऑनलाईन कुलगुरू डॉ. पी..जी. पाटील बोलत होते.

याप्रसंगी कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनील गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. चिदानंद पाटील, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, वक्ते डॉ. जितेंद्र वाळुंज, डॉ. वैष्णवी वाळुंज, इंजि. अविनाश साबळे, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. मुकुंद शिंदे, सहसंयोजक डॉ. महानंद माने, कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ शिंदे, पुणे महाविद्यालयाचे डॉ. सुनिल मासाळकर, धुळे महाविद्यालयाचे डॉ. चिंतामणी देवकर व मुक्ताईनगर महाविद्यालयाचे डॉ. जयप्रकाश गायकवाड उपस्थित होते.

कार्यक्रमात डॉ. जितेंद्र वाळुंज यांनी पृथ्वी व जलतत्त्वचा आरोग्य सुधारण्यासाठी वापर करणे, इंजि. अविनाश साबरे यांनी आहार हेच औषध तसेच डॉ. वैष्णवी वाळुंज यांनी विविध आजारांवर योग व निसर्गोपचार पद्धतीने मात कशी कराल या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. मुकुंद शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शुभांगी घाडगे यांनी तर आभार डॉ. महानंद माने यांनी मानले. या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. दगडू पारधे व डॉ. शुभांगी घाडगे यांनी काम पाहिले. यावेळी प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

15 दिवसातून एकदा कार्यशाळा

विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांचे स्वास्थ्य तणावमुक्त राहावे या हेतुने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. 15 दिवसातून एकदा अशा कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे डॉ. सुनिल गोरंटीवारे यांनी सांगितले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news