अहमदनगर : जुन्या पेन्शनसाठी नगरमध्ये आज एल्गार; राज्यव्यापी रॅलीच्या स्वागतास झेडपी कर्मचारी सज्ज

अहमदनगर : जुन्या पेन्शनसाठी नगरमध्ये आज एल्गार; राज्यव्यापी रॅलीच्या स्वागतास झेडपी कर्मचारी सज्ज

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : 'एकच मिशन, जुनी पेन्शन' ही राज्यव्यापी मोहीम विजयकुमार बंधू व वितेश खांडेकर संपूर्ण राज्यात ते कर्मचार्‍यांमध्ये जनजागृती करत आहे. आज शनिवारी 24 रोजी ही रॅली नगरमध्ये येणार आहे. त्यामुळे येथील कर्मचार्‍यांनी शेतकरी भवन येथे उपस्थित राहून रॅलीला व मोहिमेला पाठींबा देण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन 4340, कास्ट्राईब संघटना, पेन्शन शिलेदार आदी संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.

कर्मचार्‍यांच्या न्याय व हक्काच्या जुन्या पेन्शनसाठी व सरकारी नोकरीतील खासगीकरणाच्या विरोधात जुनी पेन्शन योजनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार बंधू व राज्याध्यक्ष खांडेकर यांनी संपूर्ण राज्यात रॅलीव्दारे जनजागृती सुरू केलेली आहे. आज शनिवारी नगरमध्ये ही रॅली येणार असून, तिच्या स्वागताची सर्वच कर्मचारी संघटनांनी जय्यत तयारी केली आहे. आज सकाळी 11.50 वाजता ही रॅली शेतकरी भवन मार्केट यार्डजवळ येणार आहे. यावेळी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोहिमेला पाठिंबा दर्शविणार आहे.

कास्ट्राईबही सहभागी होणार : वाकचौरे

केंद्रीय राज्याध्यक्ष अरूण गाडे प्रणित महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ अहमदनगर संघटनेचे सर्व कर्मचारी, पदाधिकारी या रॅलीत सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वाकचौरे यांनी दिली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news