संगमनेर : संचालक गणेशला वैभव प्राप्त करून देतील : आमदार बाळासाहेब थोरात | पुढारी

संगमनेर : संचालक गणेशला वैभव प्राप्त करून देतील : आमदार बाळासाहेब थोरात

संगमनेर शहर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राहता तालुक्याची कामधेनू असललेल्या गणेश कारखान्याची मागील आठ वर्षांपासून प्रगती थांबली होती. ऊस उत्पादकांचे मोठे हाल होत होते. निवडणुकीत सभासदांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत संगमनेर व संजीवनी प्रमाणे हा कारखाना चालवून नवीन संचालक मंडळ गणेश कारखान्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देईल, असा विश्वास आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर गणेश कारखान्याच्या सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवा नेते विवेक कोल्हे, कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर , डॉ. एकनाथ गोंदकर, गणेशचे संचालक नारायणराव कारले, बाबासाहेब कारले, विजय दंडवते, गंगाधर डांगे, संपत हिंगे, महेंद्र गोर्डे, बाळासाहेब शेळके, नानासाहेब नळे, सुधीर लहारे, विष्णुपंत शेळके, अनिल गाढवे, संपत चौधरी, अनिल टिळेकर, मधुकर सातव, आलेश कापसे, सुधाकर जाधव, शोभा गोंदकर, कमल धनवटे, आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले, सभासदांनी निवडणुकीत गणेश परिवर्तन पॅनलवर विश्वास दाखवला. कारखान्याच्या उत्तम व्यवस्थापनाबरोबर सभासदांना चांगला भाव देणे व कारखान्याला पुन्हा वैभव प्राप्त करून देणे यासाठी सर्व संचालकांनी काम करावे. तर युवा नेते विवेक कोल्हे म्हणाले, आ. थोरात हे राज्यातील सहकारातील अत्यंत आदर्शवत व्यक्तिमत्व आहे. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांच्या विचारांवर गणेश कारखाना सक्षमपणे चालवला जाईल, असा विश्वास व्यक्त करताना नवीन संचालक मंडळाला शुभेच्छाही दिल्या.

हेही वाचा

राहुरी : बारागाव नांदूर ग्रामपंचायतीचा बिगुल वाजला

अर्जुन उद्योग समूहाचे संतोष शिंदे यांनी पत्‍नी मुलासह जीवन संपवले

सुपा : डोक्यात कुर्‍हाड घालून एकाचा खून; नारायणगव्हाण येथील घटना

Back to top button