मिरजगाव : प्रदूषण मुक्ती, पर्यावरण रक्षणाचा संदेश | पुढारी

मिरजगाव : प्रदूषण मुक्ती, पर्यावरण रक्षणाचा संदेश

मिरजगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : प्रदूषण मुक्ती व पर्यावरण रक्षणाचा संदेश देत जाणार्‍या लासलगाव ते पंढरपूर सायकल दिंडीचे माहीजळगाव येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी कर्जत तालुका डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राजेश तोरडमल, डॉ.सागरकुमार ढोबे, डॉ.स्नेहल ढोबे, डॉ.अविनाश कदम, डॉ.कृष्णा डाडर, डॉ.शिवाजी शिंदे, डॉ.प्रवीण कदम, अंकुश देवकर, नाना वाघमारे, बनिमिया सय्यद, अशोक फरतडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लासलगाव येथील सायकलिंग संघटनेच्या वतीने सलग चौथ्या वर्षी सायकल दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण रक्षण, प्रदूषण मुक्ती आणि स्वास्थ्य व शरीर सुदृढ राहावे, असा संदेश देऊन प्रबोधन करीत असलेल्या सायकल दिंडीचे सर्वत्र उत्स्फूर्त स्वागत होत आहे. अनिल ब्रह्मेचा, संजय पाटील, सुनील ठोंबरे, रियाज शेख, डॉ अनिल ठाकरे, संजय कदम, तुषार लोणारी, डॉ.उत्तम रायते, अरूण थोरे, विजय वैद्य, ऋषी जेजूरकर, अशोक शिंदे, महेश वर्मा, डॉ. किरण निकम व सुनील चव्हाण आदी सहभागी झाले आहेत.

तंदुरुस्तीसाठी सायकल चालविणे महत्त्वाचे

ग्लोबल वॉर्मिंग, प्रतिकूल निसर्ग आणि मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा र्‍हास होत असून, यामुळे पर्जन्यवृष्टीवर परिणाम झाला आहे. तसेच व्यायामाचा अभाव असल्याने शरीर तंदुरुस्तीसाठी सायकल चालविणे महत्त्वाचे आहे. यासाठी ही सायकल वारी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

हेही वाचा

पुणे : कोरोनाने रद्द मुंजीची भरपाई मिळणार ; दाम्पत्याला ग्राहक आयोगाचा दिलासा

वाळकी : पावसाच्या दांडीने बळीराजा हतबल

Back to top button