नेवासा : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; आरोपी अटक | पुढारी

नेवासा : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; आरोपी अटक

नेवासा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील एका गावातील चोवीस वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. युवती गर्भवती झाल्याने तिच्या घरातील लोकांना हा प्रकार कळला. त्यानंतर पीडित युवतीने नेवासा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी आरोपीला दिंडीतून अटक केली आहे.

नीलेश अशोक झिंजुर्डे असे आरोपीचे नाव असून, तो पीडिताच्या घरामागे राहत होता. त्याने युवतीला तू मला आवडते, मी तुझ्याशी लग्न करतो, असे सांगून वेळोवेळी अत्याचार केला. तब्बल दोन वर्षांपासून या युवतीवर त्याचा अत्याचार सुरू होता. त्यानंतर ही युवती गर्भवती राहिल्याने तिने लग्न करण्याची आठवण करून दिली असता, त्याने भावासह तिच्या वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे ही युवती गप्प बसली होती. परंतु, ती गर्भवती असल्याचे घरातील लोकांना कळल्यानंतर त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठले.

पीडितेच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांनी कर्मचारी बबन तमनर, शाम गुंजाळ, सुमित करंजकर यांचे पथक आरोपीच्या शोधासाठी पाठविले. गावातून विठुरायाच्या भेटीला निघालेल्या दिंडीतून अशोक झिंजुर्डे याला सोलापूर रस्त्यावर श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री येथे पोलिसांनी अटक केली.

हेही वाचा

पुणे-नगर मार्गावरील सर्व्हिस रोडचे काम लाल फितीत

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा : आ : मोनिका राजळे

जागतिक विधवा महिला दिन : उद्या दिल्लीत राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

Back to top button