नगर: वडगावपानला केली विद्यार्थ्यांची ‘२१ जून जागतिक योगादिन’मध्ये बैठक व्यवस्था | पुढारी

नगर: वडगावपानला केली विद्यार्थ्यांची '२१ जून जागतिक योगादिन'मध्ये बैठक व्यवस्था

संगमनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील वडगाव पान येथील टिके मोरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक योगादिनाचे औचित्य साधत विद्यालयातील १३५ विद्यार्थ्यांची २१ जून जागतिक योग दिन या इंग्रजी अक्षरांमध्ये बैठक व्यवस्था करून योगासनांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. प्रत्येक राष्ट्रीय उत्सवाच्या दिवशी वडगावपान येथील डी. के मोरे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक बाळासाहेब कांडेकर हे प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांची त्या त्या प्रतिकृतीत बैठक व्यवस्था करत असतात.

जागतिक योग दिनाचे औचित्य साधत योगाचा प्रचार व प्रसार अधिक व्हावा हा सामाजिक संदेश क्रीडाशिक्षक बाळासाहेब कांडेकर व कलाशिक्षक सत्यानंद कसाब यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची ‘२१ जून जागतिक योगादिन’ या इंग्रजी अक्षरांमध्ये बैठक व्यवस्था करून दिला. यावेळी प्राचार्य साहेबराव कोल्हे, उपमुख्याध्यापीका श्रीमती पवार एल.आर, ज्यु. कॉलेजचे इनचार्ज प्रा.बाबा गायकवाडसह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी ही योग प्रात्यक्षिके सादर केली .

हेही वाचा:

छत्रपती संभाजीनगर : बैलजोड्यांच्या किमती वाढल्याने शेतात नांगरणीसाठी घोड्यांनाच जुंपले

नगर : जिल्ह्यात 56 हजार क्विंटल बियाणे पडून !

नगर: शासकीय विश्रामगृहात सावळा गोंधळ !

 

Back to top button