श्रीरामपूर : सरपंच साळवींचा गावकरी मंडळाला राम-राम

श्रीरामपूर : सरपंच साळवींचा गावकरी मंडळाला राम-राम
Published on
Updated on

श्रीरामपूर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : गेल्या तीन महिन्यांपासून बेलापुरात सरपंच बदलाचे वारे वाहू लागले होते, अविश्वास ठराव, सरपंच बदल अशी चर्चा सुरु असतानाच सरपंच महेंद्र साळवी यांनी अचानक घुमजाव घेत गावकरी मंडळाला रामराम करुन काँग्रेस, जनता अघाडी युतीत प्रवेश करुन बेलापुरच्या राजकीय गोटात खळबळ उडवून दिली आहे. या बाबत वृत्त असे की, बेलापूर ग्रामपंचायतीत मागील झालेल्या निवडणूकीत गावकरी मंडळाला 11 तर काँग्रेस जनता अघाडीला 6 जागा मिळाल्या होत्या. गावकरी मंडळाच्या हाती सत्ता येताच 15, 15 महिने सरपंच पद देण्याचे ठरविण्यात आले.

त्यानुसार पहीला मान महेंद्र साळवी यांनी देण्यात आला. त्यानंतर 15 महिने उलटुनही सरपंच महेंद्र साळवी राजीनामा देत नाही व श्रेष्ठी काहीच बोलत नाही, या रागातुन गावकरी मंडळातून निवडून आलेले रमेश अमोलीक यांनी गावकरी मंडळाला 'गुडबाय' करुन जनता अघाडी व काँग्रेस गटात जाहीर प्रवेश केला. त्यानंतर काही चुकीच्या कामकाजावर आवाज उठविण्याचेही काम अमोलीक यांनी केले.

सरपंच साळवी यांना 30 महिन्यापेक्षा जास्त कार्यकाळ पुर्ण करुनही राजीनामा देत नसल्यामुळे गावकरी मंडळाकडून राजीनामा देण्यासाठी दबाव आणला जावू लागला. गेल्या तीन महिन्यांपासुन सरपंच महेंद्र साळवी हे गावकरी मंडळाच्या विरोधी गटाच्या संपर्कात होते. त्यांच्या वेळोवेळी बैठकाही झाल्या होत्या. याची कुणकुण गावकरी मंडळाचे नेते शरद नवले यांना लागली होती.

तरीही त्यांनी शांततेची भुमीका घेतली. सरपंच महेंद्र साळवी यांचाही समज पक्का झाला की नेत्यांच्या पाठींब्याशिवाय कुणीच अविश्वास आणण्याचे धाडस करु शकत नाही. त्यामुळे त्यांनीही बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले जनता अघाडीचे रविंद्र खटोड भरत साळूंके यांच्याशी संधान साधले. त्यांनीही 'शत्रुचा शत्रु, तो आपला मित्र' या राजकीय उक्तीप्रमाणे साळवी यांना जवळ केले.

जि. प. सदस्य शरद नवले बाजार समीतीचे उपसभापती व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सरपंच महेंद्र साळवी यांच्या समवेत बैठक घेतली. त्यावेळी साळवी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, मी माझा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे साळवी हे रविंद्र खटोड, भरत साळूंके, सुधीर नवले यांच्या संपर्कात आल्याचे निश्चित झाल्यामुळे नवले यांनी 'तुमचा मार्ग मोळका असल्याचे सांगितले.

सकाळी सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सरपंच महेंद्र साळवी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले. गावकरी मंडळाकडे आता 9, काँग्रेस जनता अघाडीकडे 7 जागा असे सध्यातरी संख्याबळ आहे. यातील जनता अघाडीचा एक सदस्य, यापुर्वीच अपात्र ठरलेला आहे. दोनही गटांनी विरोधी गटातील दोन- दोन सदस्य संपर्कात असल्याचा दावा केलेला आहे. गावकरी मंडळाकडे 9 सदस्य असले तरी त्यातील तीन सदस्य हे मुरकुटे गटाचे आहेत.

बाजार समितीची पुनरावृती होणार का?

बाजार समीतीत विखे गटाला धक्का देवुन काँग्रेसचे सुधीर नवले सभापती झाले. गणेश कारखाना निवडणूकीतही विखेंना सत्तेपासुन दुर ठेवण्यात काँग्रेस सफल झाली तर बेलापुरातही विखेंचे निकटवर्ती शरद नवले यांच्याकडून काँग्रेसने सत्ता खेचून एक प्रकारे विखेंना शहच दिलेला असल्याची चर्चा बेलापूर वा परिसरात सुरु आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news