अहमदनगर : परराज्यातील कुख्यात पाच गुंडांची टोळी शिर्डीत जेरबंद | पुढारी

अहमदनगर : परराज्यातील कुख्यात पाच गुंडांची टोळी शिर्डीत जेरबंद

शिर्डी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शिर्डीत दडून बसलेलेल्या राजस्थान व मध्य प्रदेशातील कुख्यात पाच गुंडांच्या टोळील जेरबंद करण्यात आले. पकडलेले पाचही गुन्हेगार हे खून, दरोडा व अमलीपदार्थांची तस्करी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. कमल सिंग डुंगरसिंग राणा (वय 40, रा. बंबोरी, प्रतापगड), वीरेंद्र हरीसिंग जाट (वय 35, रा. रायनखेडा, जि. निजन, म. प्र.), सितेंद्रसिंग भारत सिंग (वय 29, रा. हरकियाखाल, म.प्र), चंदरसिंग भवरसिंग (वय 30, रा. हरकिया खाल, म. प्र.), ओमप्रकाश उर्फ गुड्डू काळूराम दावत (वय 30, रा. रेमरपुरा, निगम, म. प्र.) अशी अटकेतील गुन्हेगारांची नावे आहेत.

राजस्थान व मध्य प्रदेशातील कुख्यात गुन्हेगार शिर्डीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. राजस्थान व मध्य प्रदेश पोलिसांनी स्थानिक शिर्डी पोलिसांची मदत घेत ही कारवाई केली. खून, दरोडा व अमलीपदार्थांची तस्करी करणारी टोळी शिर्डीत असल्याची माहिती राज्यस्थान राज्य गुन्हे अन्वेषण शाखेचे अप्पर पोलिस अधीक्षक आसाराम चौधरी यांना मिळाली. त्यांनी शिर्डीचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना कळविले. दुधाळ यांनी टोळीचा ठावठिकाणा मिळविला. त्यानंतर पथकासह शिर्डीतील हॉटेल रावीरा येथे धाड टाकली. हॉटेलमधील ज्या 106 नंबरच्या खोलीत गुन्हेगार थांबले होते, ती खोली बनावट चावीच्या सहाय्याने उघडत खोलीतील पाच गुन्हेगारांना पोलिसांनी पकडले.

हेही वाचा

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील चार अभियंत्यांच्या अचानक बदल्या

जेजुरी कडेपठार मंदिरात गणपूजा

नाशिक : देवनाचा प्रकल्पासाठी गावोगावी जल संकीर्तन परिषदांचा धडाका

Back to top button