Ashadhi wari 2023 : कानिफनाथांच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

मढी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : ‘पाऊले चालली पंढरीची वाट,’ असे म्हणत मढी येथील चैतन्य कानिफनाथांची दिंडीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. देवस्थान समिती अध्यक्ष बबन मरकड यांच्या हस्ते पादुकांची माहापूजा करून दिंडी सोहळ्यास प्रांरभ झाला. नाथांच्या पादुका घेऊन मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घेेत विविध भागातून आलेल्या भाविकांनी नाथांच्या व विठ्ठल नामाच्या जयघोषात वारकरी पंढरपूरकडे मार्गस्त झाले.
वारकरी संप्रदायाचे मुळ नाथसंप्रदाय असून, त्याची मुर्हतमेढ पाथर्डी तालुक्यत रोवली गेली. आदिनाथांच्या आदेशाने चैतन्य मच्छीद्रनाथांनी मायंबा येथे, तर कानिफनाथांनी मढी येथे संजीवन समाधी घेतली. त्यामुळे नाथ संप्रदयाच्या सर्वच दिड्यांना वारकरी संप्रदयात मानाचे स्थान आहे. चैतन्य कानिफनाथयांची दिंडी, यानंतर मच्छिंद्रनाथांची दिंडी प्रस्थान ठेवते. दिंडीचा पहिला मुक्काम वेलतुरी येथे होऊन दिंडी 27 रोजी पंढपुरला पोहोचेल.
दिंडी प्रस्तानवेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष बबन मरकड, सचिव विमल मरकड, कोषाध्यक्ष भाऊसाहेब मरकड, विश्वस्त रवींद्र आरोळे, शामराव मरकड, डॉ. विलास मढीकर, माजी सरपंच भगवान मरकड, नवनाथ मरकड, शिवतेज विद्यालयाचे समन्वयक बाळासाहेब मरकड, बाबासाहेब मरकड, बाबाजी मरकड, विष्णू मरकड, एकनाथ मरकड, ग्रामपंचायत सदस्य जनार्दन मरकड, भानूविलास मरकड, विष्णू मरकड आदी उपस्थित होते. नाथ भक्तांनी कानिफनाथांच्या दिंडीचे स्वागत करून महिलांनी फुगडी खेळाचा आनंद घेतला. भाविकांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता. नाथांच्या दिंडी मार्गावर शेकडो भाविकांनी दर्शन घेतले.
हेही वाचा
Nashik : सहकार परिषद विकासाचे मॉडेल म्हणून परिचित होईल : ना. डॉ. भारती पवार